Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >हवामान > Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा पावसाचा इशारा; 'या' ६ जिल्ह्यांना यलो अलर्ट

Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा पावसाचा इशारा; 'या' ६ जिल्ह्यांना यलो अलर्ट

latest news Maharashtra Weather Update: Rain warning again in the state! Yellow alert for these 6 districts | Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा पावसाचा इशारा; 'या' ६ जिल्ह्यांना यलो अलर्ट

Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा पावसाचा इशारा; 'या' ६ जिल्ह्यांना यलो अलर्ट

Maharashtra Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचं संकट अजूनही थांबलेलं नाही. हवामान विभागाने पुन्हा एकदा १४ जिल्ह्यांत पावसाचा इशारा दिला असून ६ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. गारपीट, वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता असल्याने शेतकरी आणि नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.(Maharashtra Weather Update)

Maharashtra Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचं संकट अजूनही थांबलेलं नाही. हवामान विभागाने पुन्हा एकदा १४ जिल्ह्यांत पावसाचा इशारा दिला असून ६ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. गारपीट, वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता असल्याने शेतकरी आणि नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.(Maharashtra Weather Update)

Maharashtra Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचं संकट अजूनही कायम असून शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी परिस्थिती निर्माण झाली आहे.(Maharashtra Weather Update)

गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेला पाऊस थांबण्याची चिन्हे दिसत नसून, हवामान विभागाने शुक्रवारी (२० मार्च) देखील राज्यातील अनेक भागांत पावसाचा इशारा दिला आहे. तब्बल १४ जिल्ह्यांत पावसाची शक्यता असून ६ जिल्ह्यांना 'यलो अलर्ट' जाहीर करण्यात आला आहे.(Maharashtra Weather Update)

कोठे बरसणार सरी?

IMD ने दिलेल्या माहितीनुसार, कोकण-गोवा विभागात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा भागात काही ठिकाणी गारपीट, मेघगर्जना आणि ५० ते ६० किमी वेगाने सोसाट्याचे वारे वाहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट

हवामान विभागाने, सोलापूर, नांदेड, लातूर, धाराशिव, चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.

या भागांत विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि जोरदार वाऱ्यांची शक्यता असल्याने सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

तापमानात चढ-उतार

पुढील २४ तासांत राज्यातील कमाल तापमानात २-३ अंशांची घट होणार असून त्यानंतर पुन्हा ३-५ अंशांनी वाढ होईल.

किमान तापमानातही १-२ अंशांची घट अपेक्षित आहे.

हवामानातील या सततच्या बदलामुळे नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

शनिवारीही पावसाचा इशारा

अवकाळी पावसाचं हे संकट केवळ शुक्रवारीच नाही, तर शनिवार (२१ मार्च) रोजीही कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे शेतमालाचे नुकसान वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मुंबईत कसे असेल हवामान?

मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आकाश प्रामुख्याने निरभ्र राहील. मात्र पहाटेच्या सुमारास हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

कमाल तापमान : ३१°C

किमान तापमान : २२°C

शेतकऱ्यांसाठी सल्ला

अवकाळी पावसामुळे उभ्या पिकांना मोठा धोका निर्माण झाला आहे. विशेषतः काढणीस तयार पिके आणि साठवलेला शेतमाल सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हे ही वाचा सविस्तर : Gudi Padwa Weather Alert : गुढीपाडव्याला 'या’ भागांत मुसळधार पाऊस आणि गारपीटीचा इशारा

अधिक वाचा : Marathwada Irrigation Project : मराठवाड्याच्या दुष्काळावर मोठा उपाय; ३ सिंचन प्रकल्पांनी बदलणार चित्र!

Web Title : महाराष्ट्र मौसम अपडेट: बारिश की चेतावनी; 6 जिलों के लिए येलो अलर्ट

Web Summary : महाराष्ट्र में बेमौसम बारिश जारी, किसानों की चिंता बढ़ी। सोलापुर, नांदेड़, लातूर, धाराशिव, चंद्रपुर और यवतमाल के लिए येलो अलर्ट जारी। मुंबई में हल्की बारिश की संभावना। किसानों को फसल सुरक्षा की सलाह।

Web Title : Maharashtra Weather Alert: Rain Expected; Yellow Alert for 6 Districts

Web Summary : Maharashtra faces continued unseasonal rain, worrying farmers. A yellow alert has been issued for Solapur, Nanded, Latur, Dharashiv, Chandrapur, and Yavatmal. Light rain is expected in Mumbai. Farmers advised to protect crops.