Maharashtra Weather Update : देशभरातून नैऋत्य मोसमी पावसाने अधिकृतरीत्या माघार घेतल्यानंतर दिलासा मिळाला असला, तरी महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे संकट घोंघावत आहे. (Maharashtra Weather Update)
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. (Maharashtra Weather Update)
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या भागांसाठी वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. (Maharashtra Weather Update)
२१ ऑक्टोबरपासून राज्यात पुन्हा एकदा पावसाळी वातावरण कायम राहणार असून, २५ ऑक्टोबरपर्यंत काही जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज आहे. (Maharashtra Weather Update)
काय हवामान विभागाचा अंदाज
आज (२२ ऑक्टोबर) रोजी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, बुलढाणा या जिल्ह्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
२३ ऑक्टोबर रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, नांदेड, वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
२४ ऑक्टोबर रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नगर, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, वाशिम, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात यलो अलर्ट करण्यात आला आहे.
२५ ऑक्टोबर रोजी रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव आणि संपूर्ण विदर्भात वादळी पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे.
'ऑक्टोबर हिट' आणि आता पावसाचा तडाखा!
राज्यात गेल्या काही दिवसांपासून 'ऑक्टोबर हिट' मुळे तापमान वाढले होते. आता या उष्णतेनंतर पुन्हा पावसाचे आगमन झाल्याने हवामानात मोठा बदल होणार आहे.
बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्राच्या आग्नेयेकडे केरळ-लक्षद्वीप किनाऱ्याजवळ आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असून, त्यामुळे दिवाळीपूर्वी राज्यात वादळी पावसाचे वातावरण निर्माण होऊ शकते.
शेतकऱ्यांना सल्ला
* जर आपल्या भागात पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे त्या ठिकाणी काढणी २–३ दिवस पुढे ढकला. ओले हवामानात काढणी केल्यास उत्पादनाच्या गुणवत्तेवर परिणाम होतो.
* उत्पादन साठवताना काळजी घ्यावी काढलेले धान्य, कापूस किंवा सोयाबीन खुले मैदानात ठेवू नये. प्लास्टिक शीटखाली किंवा शेडमध्ये साठवावे.
* बियाणे व धान्य साठवण करताना ओलाव्यामुळे बुरशी, डाग आणि अंकुर फुटण्याचा धोका असतो. त्यामुळे साठवण जागा हवेशीर व कोरडी ठेवा.
* पावसाची शक्यता असल्यास ड्रिप किंवा स्प्रिंकलर सिंचन प्रणाली बंद ठेवा. जास्त ओलावा पिकांच्या मुळांना हानिकारक ठरतो, असा सल्ला देण्यात आला आहे.