Maharashtra Weather Update : राज्यात मान्सूनचा जोर पुन्हा वाढला असून आज मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे.(Maharashtra Weather Update)
गेल्या काही दिवसांच्या मान्सून ब्रेक नंतर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असून, त्याचा परिणाम म्हणून राज्यभर पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे.(Maharashtra Weather Update)
आज कुठे पावसाचा अलर्ट?
रत्नागिरी, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, नगर, परभणी, नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांत आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, धुळे आणि जळगावमध्ये हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
मराठवाड्यात पुढील चार दिवसांचा अंदाज
आज ९ऑगस्ट रोजी नांदेड, लातूर, धाराशिव, बीड, परभणी, हिंगोली येथे वादळी वारे (ताशी ३०-४० किमी), मेघगर्जना आणि हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तविण्यात आला आहे.
१० ऑगस्ट रोजी काही ठिकाणी हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे.
११ ऑगस्ट रोजी लातूर, धाराशिव, बीड येथे वादळी वारे व मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
१२ ऑगस्ट रोजी नांदेड, परभणी, हिंगोली येथे वादळी वारे व पाऊस पडण्याची शक्यता आहे.
रक्षाबंधनला पावसाची हजेरी
आज रक्षाबंधनच्या दिवशी मान्सून सक्रिय झाला आहे. सकाळपासूनच कोकण, मुंबई, मराठवाडा आणि विदर्भात पावसाची उपस्थिती आहे.
मुंबईत दमट, ढगाळ वातावरण असून हलक्या ते मध्यम सरी सुरू आहेत. पुढील पाच दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.