Maharashtra Weather Update : राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढू लागला असून हवामान विभागाने आज (५ सप्टेंबर) रोजी अनेक जिल्ह्यांसाठी यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. (Maharashtra Weather Update)
विशेषतः कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.(Maharashtra Weather Update)
सातारा जिल्हात गेल्या २४ तासांत पावसाची उघडीप राहिल्यानंतर आज पुन्हा साताऱ्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. यामुळे हवामान विभागाने यलो अलर्ट दिला असून उर्वरित जिल्ह्यात मध्यम पावसाची शक्यता आहे. (Maharashtra Weather Update)
पुणे जिल्हात पावसाची उघडीप राहिली असली तरी पुढील २४ तासांत पुणे घाटमाथ्यावर मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे. उर्वरित पुणे जिल्ह्यात हलक्या सरींची शक्यता आहे.
कोल्हापूर जिल्हात गेल्या २४ तासांत ०.८ मिमी पाऊस झाला असून कमाल तापमान २७ अंश नोंदले गेले. पुढील २४ तासांत तापमान २४ अंश राहील. कोल्हापूर घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने यलो अलर्ट देण्यात आला आहे.
सांगली जिल्हात गेल्या २४ तासांत १ मिमी पाऊस झाला. कमाल तापमानात घट होऊन ते २९.४ अंश नोंदले गेले. पुढील २४ तासांत मध्यम पावसाची शक्यता असून तापमान पुन्हा ३० अंश पर्यंत वाढण्याचा अंदाज आहे.
सोलापूर जिल्हात गेल्या २४ तासांत पावसाचा अभाव असून तापमान ३२.७ अंश नोंदले गेले. पुढील २४ तासांत जिल्ह्यात मध्यम पावसाचा अंदाज वर्तविण्यात आली आहे.
राज्यातील हवामान स्थिती काय?
कोकण विभागातील पालघर, ठाणे, रायगड जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, तर मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्गला यलो अलर्ट जारी करण्यात आले आहे.
पश्चिम महाराष्ट्रात पुणे (घाटमाथा – ऑरेंज), कोल्हापूर आणि सातारा (घाटमाथा – यलो), सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस पडेल.
मराठवाड्यात संभाजीनगर व जालना जिल्ह्यांत वादळ विजांसह पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला असून परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
उत्तर महाराष्ट्रात धुळे, जळगाव, नाशिक जिल्ह्यांत वादळ-विजांसह मुसळधार पावसाचा यलो अलर्ट, तर नंदुरबार व नाशिक घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
विदर्भात अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूरसह सर्व जिल्ह्यांत पावसाचा अंदाज नाही तर आंशिक ढगाळ वातावरण राहणार आहे.
शेतकऱ्यांना सल्ला
* सोयाबीन, तूर, उडीद, मूग अशा डाळींच्या पिकात पाणी साचू देऊ नका.
* कपाशीच्या शेतात पाणी तुंबणार नाही याची काळजी घ्या, अन्यथा किड व रोगराई वाढू शकते.
* भाजीपाला पिकांवर फवारणी टाळा, कारण पावसात औषधाचा परिणाम कमी होतो.