Join us

Maharashtra Weather Update: राज्यात मान्सूनपूर्व पावसाचा जोरदार कहर; IMD ने जारी केला अलर्ट वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 09:14 IST

Maharashtra Weather Update : राज्यात मान्सूनपूर्व पावसाने (Pre-Monsoon Rains) जोरदार हजेरी लावत हवामानाचा नुर बदलला आहे. लातूर, सोलापूर, नांदेडपासून ते कोकण किनारपट्टीपर्यंत अनेक भागांत मुसळधार पावसाने हजेरी लावली असून काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. येत्या २४ तासांत आणखी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तर काही जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. (Pre-Monsoon Rains)

Maharashtra Weather Update : राज्यात मान्सूनपूर्व पावसाने (Pre-Monsoon Rains) जोरदार हजेरी लावत हवामानाचा नुर बदलला आहे. लातूर, सोलापूर, नांदेडपासून ते कोकण किनारपट्टीपर्यंत अनेक भागांत मुसळधार पावसाने हजेरी लावली असून काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. (Pre-Monsoon Rains)

विजेच्या गडगडाटासह झालेल्या पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाला, तर सखल भागांमध्ये पाणी साचून नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. हवामान विभागाने पुढील काही तासांत आणखी पावसाची शक्यता वर्तविली असून काही जिल्ह्यांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. (Pre-Monsoon Rains)

IMD ने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाचा (Pre-Monsoon Rains) जोर कायम असून, अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हवामान विभागाने कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा इशारा दिला आहे. (Pre-Monsoon Rains)

आज (२२ मे रोजी) रायगड, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच कोकणपट्ट्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे तर राज्यातील इतर भागात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने कले आहे. (Pre-Monsoon Rains)

मान्सूनपूर्व पावसाचा कहर

राज्यात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली असून अनेक जिल्ह्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झालं आहे. लातूर, सोलापूर, नांदेडसह कोकण आणि घाटमाथ्याच्या भागांमध्ये मुसळधार पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.

सिंधुदुर्गसाठी रेड अलर्ट

सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. किनारपट्टीवर वाऱ्याचा वेग ताशी ३०-४० किलोमीटरपर्यंत जाऊ शकतो. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीय स्थितीमुळे पुढील ३६ तासांत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा प्रशासनाकडून इशारा देण्यात आला आहे.

नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन

राज्यातील अनेक भागांमध्ये वीज, वाहतूक आणि पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज असून नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडू नये, सुरक्षित स्थळी थांबावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांना सल्ला

* जमीन ओली असताना नांगरणी किंवा मशागत करू नये.

* अवजारे व यंत्रसामग्री सुरक्षित ठिकाणी ठेवावीत, असा सल्ला देण्यात आला आहे.

हे ही वाचा सविस्तर : Marathawada Weather Update: मराठवाड्यातील हवामानात मोठा बदल; शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा! वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रहवामान अंदाजपाऊसमहाराष्ट्रकोकणविदर्भमराठवाडाशेतकरी