Maharashtra Weather Update : राज्यात सध्या जाणवणारी कडाक्याची थंडी पुढील काही दिवसांत हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे. IMD ने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील हवामानात पुढील चार दिवसांत महत्त्वाचे बदल होणार असून किमान तापमानात वाढ होण्याची चिन्हे दिसत आहेत.(Maharashtra Weather Update)
राज्यात थंडीचा प्रभाव कायम, मात्र दिलासा मिळणार?
महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागात सध्या हिवाळ्याचा प्रभाव जाणवत आहे. उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे गेल्या काही दिवसांत राज्यातील अनेक शहरांमध्ये किमान तापमान लक्षणीयरीत्या घसरले होते.
मात्र हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील २४ तासांत किमान तापमानात कोणताही मोठा बदल होणार नाही. त्यानंतर पुढील चार दिवसांत तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता असून, त्यामुळे थंडीचा कडाका काहीसा कमी होऊ शकतो.
मुंबई आणि उपनगरांचे हवामान
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पुढील २४ तासांत हवामान प्रामुख्याने कोरडे आणि निरभ्र राहील. सध्या मुंबईकरांना सकाळी आणि रात्री गारवा जाणवत असून, दुपारी उन्हाचा चटका जाणवतो आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार,कमाल तापमान सुमारे ३१ अंश सेल्सिअस तर किमान तापमान हे सुमारे १७ अंश सेल्सिअस राहील.यामुळे पुढील काही दिवस मुंबईत संमिश्र हवामान अनुभवायला मिळणार आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाचा अंदाज
कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.
आकाश स्वच्छ राहील आणि पावसाची कोणतीही शक्यता नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
पुढील चार दिवसांत किमान तापमानात वाढ झाल्याने सकाळच्या थंडीपासून काहीसा दिलासा मिळू शकतो.
गेल्या २४ तासांत नोंदवलेले किमान तापमान
राज्यातील प्रमुख शहरांमध्ये नोंदवलेले किमान तापमान पुढीलप्रमाणे आहे.
मुंबई (कुलाबा) : १९.४°C
मुंबई (सांताक्रूझ) : १६.५°C
अहिल्यानगर : ७.५°C
पुणे : ८.४°C
मालेगाव : ९.८°C
नाशिक : ९.१°C
छत्रपती संभाजीनगर : १०.७°C
नागपूर : १०.२°C
यवतमाळ : १०.४°C
राज्यात सर्वात कमी किमान तापमान अहिल्यानगर येथे नोंदवले गेले आहे.
जिल्हानिहाय हवामान अंदाज काय?
कोकणात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.
विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.
शेतकरी आणि नागरिकांसाठी सूचना
थंडीचा प्रभाव हळूहळू कमी होणार असला तरी सकाळी व रात्री गारवा कायम राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, तर शेतकऱ्यांनी पिकांवरील दव आणि थंडीचा परिणाम लक्षात घेऊन योग्य खबरदारी घ्यावी, असे आवाहन हवामान तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.
