Maharashtra Weather Update : मागील चार दिवसांपूर्वीचे आणि आताचे वातावरण पाहिले, तर मोठा बदल स्पष्टपणे जाणवतो.काही दिवसांपासून राज्यात कडाक्याची थंडी होती, मात्र नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी हवामानाने अचानक कलाटणी घेतली.(Maharashtra Weather Update)
१ जानेवारी २०२६ रोजी महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली, त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.(Maharashtra Weather Update)
नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला राज्यात जोरदार पाऊस झाला होता. त्यानंतर नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाने राज्यातून माघार घेतली होती. मात्र, जानेवारी महिन्याच्या पहिल्याच दिवशी पुन्हा पावसाची एन्ट्री झाल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.(Maharashtra Weather Update)
सध्या देशातील विविध भागांमध्ये पावसाचे वातावरण असून महाराष्ट्रातील काही भागांत ढगाळ हवामान कायम आहे.(Maharashtra Weather Update)
IMD चा काय आहे इशारा
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, आजपासून ५ जानेवारीपर्यंत देशातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
काही ठिकाणी पावसासह गारपीट होण्याचाही इशारा देण्यात आला आहे. पुढील २४ ते ७२ तास हवामान अस्थिर राहणार असून राज्यातून पाऊस पूर्णपणे जाणार नाही, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
जानेवारीतही थंडी कायम
IMD च्या अंदाजानुसार, जानेवारी महिन्यातही थंडीचा प्रभाव कायम राहणार आहे.
मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहारसह मराठवाडा आणि विदर्भात थंडीची लाट जाणवेल. मात्र, याच काळात काही भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता असून हवामानात सतत बदल होत राहतील.
उत्तर भारतात पावसाचा इशारा
उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे. मेरठ, गाझियाबाद, नोएडा, हापूर, बागपत, बुलंदशहर, सहारनपूर, शामली, मोरादाबाद आणि बिजनौर या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. तसेच २ ते ५ जानेवारीदरम्यान जम्मू-काश्मीर, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम तसेच दक्षिण भारतातही पावसाची शक्यता असून काही भागांत गारपीट होऊ शकते.
आजचा अंदाज काय?
कोकणात हवामान कोरडे राहील.
मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडे असेल.
मराठवाड्यात हवामान कोरडे राहील.
विदर्भातही हवामान कोरडे राहील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
शेतकऱ्यांना सल्ला
* हरभरा, गहू, कांदा, लसूण, ज्वारी आदी पिकांमध्ये पाणी साचू देऊ नका. शेतात योग्य निचरा ठेवा.
* ढगाळ वातावरणामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढू शकतो, त्यामुळे रोगलक्षणे दिसताच तज्ज्ञांच्या सल्ल्याने फवारणी करावी, असा सल्ला देण्यात आला आहे.
