Maharashtra Weather Update : राज्यातील १३ जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने विजांच्या गडगडाटासह पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. सध्या राज्यात उष्णतेची तीव्रता वाढली असून पावसाचा खंड सुरू आहे. (Maharashtra Weather Update)
अशावेळी पिकांचे संरक्षण आणि योग्य व्यवस्थापन शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.(Maharashtra Weather Update)
राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. परिणामी, दिवसेंदिवस उष्णतेची तीव्रता वाढत आहे आणि नागरिकांना उकाड्याचा मोठा त्रास जाणवत आहे. (Maharashtra Weather Update)
अनेक भागांत ढगाळ वातावरण असून तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी कोसळत आहेत. मात्र, चंद्रपूरसारख्या जिल्ह्यांमध्ये तापमान ३४.८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले असून, हे राज्यातील सर्वाधिक तापमान नोंदवले गेले आहे.(Maharashtra Weather Update)
पावसाचा अलर्ट जारी
हवामान खात्याने आज (५ ऑगस्ट) रोजी १३ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
यलो अलर्ट जिल्हे
राज्यातील सांगली, सोलापूर, लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली,नांदेड, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
इतर जिल्ह्यांमध्येही पावसाची शक्यता
ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये हवामान ढगाळ राहणार असून काही ठिकाणी विजांसह हलक्या सरी पडू शकतात, असा अंदाज आहे.
हवामान बदलामागील कारणे
* कमी दाबाचा पट्टा अमृतसर ते अरुणाचल प्रदेश दरम्यान सक्रिय
* तमिळनाडूच्या किनाऱ्यालगत ३.१ ते ७.६ किमी उंचीवर चक्राकार वारे
* यामुळे पूर्व-मध्य भारतातून अरबी समुद्रापर्यंत हवेचा दाब बदलतो आहे
* याचा अप्रत्यक्ष परिणाम महाराष्ट्रातील हवामानावर जाणवत आहे
शेतकऱ्यांना सल्ला
* पावसाचा खंड असल्यामुळे जमिनीतला ओलावा टिकवण्यासाठी पाण्याचे व्यवस्थापन करावे.
* शेतात भेगा पडू नयेत म्हणून खतपाण्याचे योग्य नियोजन करा.
* कीड आणि रोग नियंत्रण करण्यासाठी वाढत्या उकाड्यामुळे कीटक आणि रोग वाढू शकतात.
* पिकांची नियमित पाहणी करा आणि गरजेनुसार कीटकनाशकांचा वापर करा, असा सल्ला देण्यात आला आहे.