Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >हवामान > Maharashtra Weather Alert : अरबी समुद्रातून धडकणारं 'हे' संकट महाराष्ट्राला झोडपणार; पाहा तुमच्या जिल्ह्याची स्थिती

Maharashtra Weather Alert : अरबी समुद्रातून धडकणारं 'हे' संकट महाराष्ट्राला झोडपणार; पाहा तुमच्या जिल्ह्याची स्थिती

latest news Maharashtra Weather Alert: 'This' disaster coming from the Arabian Sea will hit Maharashtra; See the condition of your district | Maharashtra Weather Alert : अरबी समुद्रातून धडकणारं 'हे' संकट महाराष्ट्राला झोडपणार; पाहा तुमच्या जिल्ह्याची स्थिती

Maharashtra Weather Alert : अरबी समुद्रातून धडकणारं 'हे' संकट महाराष्ट्राला झोडपणार; पाहा तुमच्या जिल्ह्याची स्थिती

Maharashtra Weather Alert : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने आता उग्र रूप धारण केले आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील ४८ तास राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. अरबी समुद्रातून येणाऱ्या आर्द्रतेमुळे आणि राजस्थानमधील चक्रीय वातस्थितीमुळे (Cyclonic Circulation) राज्यातील ७ जिल्ह्यांमध्ये जोरदार वारे आणि गारपिटीसह पावसाची शक्यता आहे. (Maharashtra Weather Alert)

Maharashtra Weather Alert : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने आता उग्र रूप धारण केले आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील ४८ तास राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. अरबी समुद्रातून येणाऱ्या आर्द्रतेमुळे आणि राजस्थानमधील चक्रीय वातस्थितीमुळे (Cyclonic Circulation) राज्यातील ७ जिल्ह्यांमध्ये जोरदार वारे आणि गारपिटीसह पावसाची शक्यता आहे. (Maharashtra Weather Alert)

Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रात अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांनी अचानक हजेरी लावत ग्रामीण भागात मोठं संकट निर्माण केलं आहे. (Maharashtra Weather Alert)

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.(Maharashtra Weather Alert)

या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने ७ जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करत नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.(Maharashtra Weather Alert)

या ७ जिल्ह्यांना 'ऑरेंज अलर्ट'

हवामान विभागाने प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील ७ जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यामध्ये खालील जिल्ह्यांचा समावेश आहे.

जळगाव, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड आणि हिंगोली या भागात ३० ते ७० किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहण्याची आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.

इतर जिल्ह्यांची स्थिती (यलो अलर्ट)

उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे तसेच विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे.

या ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. तर मुंबई, पुणे आणि ठाणे परिसरात ढगाळ वातावरण आणि उकाडा कायम राहील.

हवामान बदलामागील काय कारणं

हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार,

* राजस्थान परिसरात निर्माण झालेलं सायक्लोनिक सर्क्युलेशन (Cyclonic Circulation)

* उत्तर भारतातील सक्रिय ट्रफ लाईन

* अरबी समुद्रातून खेचली जाणारी आर्द्रता आणि वेस्टर्न डिस्टर्बन्स

या सर्व घटकांमुळे महाराष्ट्रात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे.

शेतकऱ्यांना सल्ला

* शेतकरी बांधवांनी काढणी केलेले धान्य सुरक्षित ठिकाणी झाकून ठेवावे. जनावरांना सुरक्षित निवाऱ्यात बांधावे.

* विजा चमकत असताना झाडाखाली किंवा मोकळ्या मैदानात उभे राहू नका. शक्य असल्यास घराबाहेर पडणे टाळा.

हे ही वाचा सविस्तर : Hailstorm Alert in Marathwada : मराठवाड्यावर गारपीटीचे सावट; 'या' ५ जिल्ह्यांना पुढील ४८ तास धोक्याचे वाचा सविस्तर

अधिक वाचा : Electricity Bill Problems : वीजबिल अचानक वाढलं? स्मार्ट मीटर नव्हे; 'हे' आहे खरे कारण

Web Title : महाराष्ट्र मौसम अलर्ट: 7 जिलों में भारी बारिश, तूफान का खतरा।

Web Summary : महाराष्ट्र में बेमौसम बारिश और तूफान से मौसम का संकट। उत्तरी महाराष्ट्र और मराठवाड़ा के सात जिलों में भारी बारिश और तेज हवाओं के लिए ऑरेंज अलर्ट जारी किया गया है। अन्य जिलों में येलो अलर्ट है। किसानों को काटी गई फसलों को सुरक्षित रखने की सलाह दी जाती है।

Web Title : Maharashtra Weather Alert: Heavy rain, storm to lash 7 districts.

Web Summary : Maharashtra faces weather turmoil with unseasonal rains and storms. Seven districts, mainly in North Maharashtra and Marathwada, are under orange alert for heavy rainfall and strong winds. Other districts have a yellow alert. Farmers are advised to protect harvested crops.