Join us

Maharashtra Rain Alert : पूर्वमोसमी पावसाची सुरुवात; 'या' जिल्ह्यांना गारपीटीचा धोका वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 09:18 IST

Maharashtra Rain Alert : राज्यात काही ठिकाणी पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली असून हवामान विभागाने नाशिक आणि सातारा जिल्ह्यांत गारपीट आणि वादळी वाऱ्यांसह पावसाचा (hailstorm) इशारा दिला आहे. (Maharashtra Weather Updates)

Maharashtra Rain Alert : राज्यात काही ठिकाणी पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली असून हवामान विभागाने नाशिक आणि सातारा जिल्ह्यांत गारपीट आणि वादळी वाऱ्यांसह पावसाचा (hailstorm) इशारा  दिला आहे. (Maharashtra Weather Updates)

पुणे आणि अहमदनगरसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. (hailstorm)

IMD ने दिलेल्या माहितीनुसार, कोकण किनारपट्टीवर चक्राकार वाऱ्यांचा प्रभाव असल्याने हवामानात बदल झाला आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. (Maharashtra Rain Alert)

पूर्वमोसमी पाऊस सक्रिय (Pre-monsoon)

राज्यात आज (१५ मे) रोजी नाशिक आणि सातारा जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे. राज्यातील काही भागात गारपिटीचीही शक्यता वर्तविण्यात आली आहे. पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

रत्नागिरी, रायगडसह नाशिक, पुणे, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, लातूर, नांदेड, धाराशिव आणि नागपूरमध्ये पावसाची नोंद झाली आहे.

विदर्भातील चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदविण्यात आला असून, इतर अनेक जिल्ह्यांमध्येही उष्णतेची तीव्रता कायम आहे.

मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा

यंदा मान्सून अंदमानात ८-१० दिवस आधी दाखल झाला आहे.  मान्सून २५ ते २७ मेदरम्यान केरळमध्ये दाखल होणार आहे. त्यानंतर २ जूनच्या सुमारास तो महाराष्ट्रात पोहोचेल, अशी शक्यता आहे. 

सुरुवातीला तळकोकणात मान्सून पोहोचून नंतर राज्यभर पसरण्याचा अंदाज आहे. ६ ते १५ जूनदरम्यान महाराष्ट्राच्या सर्व भागांमध्ये मान्सून सक्रिय होईल, असेही हवामान विभागाने कळविले आहे.  (Monsoon Updates)

शेतकऱ्यांना सल्ला

* फळबागांमधील झाडांची छाटणी करून त्यांना आधार द्या, जेणेकरून वाऱ्यामुळे झाडे कोसळणार नाहीत.

* शेतातील लहान झाडांना दोरीने किंवा बांबूने आधार द्या, असा सल्ला देण्यात आला आहे.

हे ही वाचा सविस्तर : Farmers Safety: वीज कोसळताना... एक चुकीचे पाऊल, जीवावर बेतू शकतो! वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रहवामान अंदाजमहाराष्ट्रकोकणविदर्भमराठवाडानाशिकपाऊस