Maharshtra Rain Alert : बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या वाऱ्यांनी महाराष्ट्रात पावसाची (Heavy Rain) जोरदार एंट्री केली असून, पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे.(Maharshtra Rain Alert)
महाराष्ट्रात मान्सूनने दमदार प्रवेश करताच कोकण आणि पश्चिम घाट परिसरात समाधानकारक पर्जन्यमानाची नोंद झाली. मात्र, आता पुढील काही दिवस राज्यभरात पावसाचा जोर अधिक वाढणार आहे. (Maharshtra Rain Alert)
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा जोर (Heavy Rain) जाणवणार असून, काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अनुभव येण्याची शक्यता आहे.(Maharshtra Rain Alert)
कोकणात मुसळधार पावसाची शक्यता
बंगालच्या उपसागरातून सरकणाऱ्या वायव्य मान्सून वाऱ्यांच्या प्रणालीमुळे कोकण व घाटमाथ्यावरील भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील ४-५ दिवस कोकणातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा जोरदार फटका बसण्याची शक्यता आहे.
राज्यात 'ऑरेंज अलर्ट' जारी
बुधवार (३ जुलै) रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील घाटमाथा परिसरात ऑरेंज अलर्ट
गुरुवार (४ जुलै) : रायगड, सिंधुदुर्ग, पुणे आणि सातारा जिल्ह्यांतील घाटमाथ्यावरील परिसरांसाठी पुन्हा ऑरेंज अलर्ट
मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात विजांचा इशारा
मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा जोर जाणवण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. नागरिकांनी सुरक्षिततेची खबरदारी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
देशभरातील हवामानाचा आढावा
देशाच्या उत्तर भागांमध्येही मान्सूनने जोरदार हजेरी लावली असून, नद्यांना आलेल्या पुरामुळे अनेक राज्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे.
उत्तर भारत : पंजाब, हरियाणा, दिल्ली, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या राज्यांत हलक्यापासून मध्यम स्वरुपाचा पाऊस
मध्य व पूर्व भारत : मध्य प्रदेश, झारखंड, गुजरातच्या पूर्व भागांमध्ये मध्यम पावसाची शक्यता
दक्षिण भारत : केरळ, कर्नाटक, रायलसीमा आणि तामिळनाडूमध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस
गोवा : मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज
शेतकऱ्यांना सल्ला
* बियाण्यांची पेरणी करताना जमिनीची आर्द्रता तपासा
* जास्त पावसामुळे जमीन चिखलमय झाल्यास पेरणी थांबवा.
* वाफसा स्थिती असेल तरच मशागत करा
* जोरदार पावसात मशागत किंवा पेरणी केल्यास नुकसान होण्याची शक्यता.