Maharashtra Summer Heatwave Alert: राज्यात उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत असून तापमानात आता सातत्याने वाढ होताना दिसत आहे.होळीनंतर उष्णतेचा जोर अधिक वाढताना दिसत आहे. नागरिकांसह शेतकरीही उकाड्याने हैराण झाले आहेत.(Maharashtra Heatwave Alert)
IMD ने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील काही दिवसांसाठी तापमानात आणखी वाढ होण्याचा इशारा दिला आहे. राज्याच्या अंतर्गत भागात पुढील ५ ते ६ दिवसांत कमाल तापमानात हळूहळू २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे.(Maharashtra Heatwave Alert)
तर उत्तर कोकणात पुढील दोन दिवस तापमानात २ ते ४ अंश सेल्सिअसने घट होण्याचा अंदाज असून त्यानंतर पुन्हा २ ते ३ अंशांनी वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत उष्णतेची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.(Maharashtra Heatwave Alert)
राज्यातील अनेक भागात सध्या कोरडे हवामान असून काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेसारखी परिस्थिती निर्माण होत आहे. विशेषत: उत्तर कोकण आणि किनारपट्टी भागात उष्ण आणि दमट हवामानामुळे नागरिकांना उकाड्याचा त्रास जाणवत आहे. (Maharashtra Heatwave Alert)
मुंबईत उष्ण व दमट वातावरण
मुंबईत आज आकाश मुख्यत: निरभ्र राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. मुंबई शहर आणि उपनगरात उष्ण आणि दमट वातावरण राहण्याची शक्यता आहे.
मुंबईत कमाल तापमान सुमारे ३६ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. दमट वातावरणामुळे उकाड्याची तीव्रता अधिक जाणवू शकते.
कुठे नोंदवले सर्वाधिक तापमान?
गुरुवारी उत्तर कोकण आणि किनारपट्टी भागात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेसारखी परिस्थिती निर्माण झाली होती. या भागात हवामान कोरडे राहिले आणि तापमान सामान्यपेक्षा लक्षणीयरीत्या जास्त नोंदवले गेले.
उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा तसेच दक्षिण गुजरातच्या काही भागातही तापमान सरासरीपेक्षा अधिक होते. नंदुरबार येथे ३९ अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली असून ते राज्यातील सर्वाधिक तापमान ठरले.
तर अहिल्यानगर येथे १४.७ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदवले गेले, जे राज्यातील सर्वात कमी किमान तापमान होते.
आजचा हवामान अंदाज
कोकण: हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्र: हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे.
मराठवाडा: कोरडे आणि उष्ण वातावरण राहील आहे.
विदर्भ: हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.
राज्यात पुढील काही दिवस पावसाची शक्यता कमी असून तापमानात वाढ होत राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी उष्माघात टाळण्यासाठी दुपारच्या वेळी बाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.
शेतकऱ्यांना सल्ला
* राज्यात तापमान वाढण्याची शक्यता लक्षात घेता शेतकऱ्यांनी पिकांचे संरक्षण करण्यासाठी काही खबरदारी घेणे आवश्यक आहे, असा सल्ला देण्यात आला आहे.
