Cold wave in Maharashtra : राज्यातील हवामानात आता मोठा बदल झाला वातावरणात चांगलाच गारवा जाणवत आहे. उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात थंडीची लाट जाणवू लागली आहे. (Cold wave in Maharashtra)
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, आज (१२ नोव्हेंबर) रोजी काही जिल्ह्यांसाठी थंडीचा इशारा जारी केला आहे. दिवसा उन्हाचे चटके बसतील, पण सकाळी आणि रात्री थंडगार वातावरण जाणवणार आहे. (Cold wave in Maharashtra)
राज्यभर आकाश प्रामुख्याने निरभ्र राहील. दिवसा उन्हाचा तडाखा असेल, तर रात्री आणि पहाटे तापमान घटेल. पुढील काही दिवसांत तापमानात आणखी घट होऊन थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे. (Cold wave in Maharashtra)
मुंबई आणि कोकण विभाग
मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत आकाश निरभ्र राहणार आहे.
मुंबई तापमान: कमाल ३४°C | किमान २१°C
या भागात हवामान कोरडे आणि उबदार राहील, दिवसा उकाडा जाणवेल तर रात्री गारवा जाणवेल.
पश्चिम महाराष्ट्र
पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर आणि घाटमाथा परिसरात आकाश स्वच्छ राहणार आहे.
पुणे तापमान: कमाल २९°C | किमान १३°C
या भागात तापमान सातत्याने घसरत आहे. त्यामुळे नागरिकांनी थंडीपासून बचावासाठी उबदार कपड्यांचा वापर करावा, असा सल्ला हवामान खात्याने दिला आहे.
छत्रपती संभाजीनगरसह बीड, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड, धाराशिव आणि जालना जिल्ह्यांत आकाश स्वच्छ आणि कोरडे राहील.
छत्रपती संभाजीनगर तापमान: कमाल ३१°C | किमान ११°C
या भागात थंडीचा प्रभाव स्पष्टपणे जाणवेल. पहाटेच्या वेळी गारठा वाढण्याची शक्यता आहे.
उत्तर महाराष्ट्र
नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहमदनगर जिल्ह्यांत थंडीचा प्रभाव वाढणार आहे.
नाशिक तापमान: कमाल ३१°C | किमान १२°C
या भागात पुढील काही दिवसांत तापमान आणखी घसरण्याची शक्यता असून, हवामान विभागाने नागरिकांना उबदार कपड्यांचा वापर करण्याचा आणि थंडीपासून काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.
नागपूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, भंडारा, गोंदिया, वर्धा, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्येही आकाश निरभ्र राहील.
नागपूर तापमान: कमाल २८°C | किमान १२°C
थंडीचा प्रभाव वाढत असून सकाळच्या सुमारास दव पडण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याचा अलर्ट
राज्यात सर्वत्र तापमान घटत असल्याने थंडीचा कडाका येत्या काही दिवसांत वाढेल. विशेषतः ग्रामीण आणि पठारी भागात पहाटे गारठा वाढेल.
नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी.
लहान मुले, वृद्ध आणि शेतकरी वर्गाने उबदार कपडे वापरावेत.
सकाळच्या सुमारास शेतकाम करताना थंडीपासून बचावाचे उपाय करावेत.
शेतकऱ्यांना सल्ला
* रब्बी पिकांसाठी योग्य काळ सुरू झाला आहे. जमिनीतील ओल टिकवून ठेवण्यासाठी हलकी आंतरमशागत करा.
* शेतात काम करताना काळजी घ्या. सकाळच्या वेळेस गारठ्यात काम करताना उबदार कपडे व हातमोजे वापरा, असा सल्ला देण्यात आला आहे.
हे ही वाचा सविस्तर :
