Lokmat Agro >हवामान > Koyna Dam Water Level : कृष्णेची पाणीपातळी पुन्हा वाढणार; कोयना धरणातून विसर्ग वाढवला

Koyna Dam Water Level : कृष्णेची पाणीपातळी पुन्हा वाढणार; कोयना धरणातून विसर्ग वाढवला

Koyna Dam Water Level : Krishna water level will increase again; Release increased from Koyna Dam | Koyna Dam Water Level : कृष्णेची पाणीपातळी पुन्हा वाढणार; कोयना धरणातून विसर्ग वाढवला

Koyna Dam Water Level : कृष्णेची पाणीपातळी पुन्हा वाढणार; कोयना धरणातून विसर्ग वाढवला

कोयना धरणाचे दरवाजे तीन फुटांपर्यंत उघडले असून, २७ हजार ३०० क्युसेकने विसर्ग सुरू आहे. कृष्णा नदीची पाणीपातळी काही प्रमाणात वाढणार असून, नदीकाठीच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

कोयना धरणाचे दरवाजे तीन फुटांपर्यंत उघडले असून, २७ हजार ३०० क्युसेकने विसर्ग सुरू आहे. कृष्णा नदीची पाणीपातळी काही प्रमाणात वाढणार असून, नदीकाठीच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

शेअर :

Join us
Join usNext

मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यासह धरण क्षेत्रात पावसाने उसंत घेतली आहे. कोयना धरणात १०१.३५ टीएमसी पाणीसाठा झाला असून, ९६ टक्के भरल्याने विसर्ग वाढविण्यात आला.

धरणाचे दरवाजे तीन फुटांपर्यंत उघडले असून, २७ हजार ३०० क्युसेकने विसर्ग सुरू आहे. कृष्णा नदीचीपाणीपातळी काही प्रमाणात वाढणार असून, नदीकाठीच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

धरण क्षेत्रातही पावसाने पूर्ण उघडीप दिली आहे. मात्र, कोयना धरणात १०१.३५ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. तो नियंत्रित ठेवण्यासाठी मंगळवारी सायंकाळी धरणाचे दरवाजे दोन फुटांवरून तीन फुटांपर्यंत उघडण्यात आले आहेत.

नदीपात्रात २५ हजार २०० आणि विद्युत गृहातून दोन हजार १०० क्युसेक असा मिळून २७ हजार ३०० क्युसेक विसर्ग सुरू केला आहे. त्यामुळे कृष्णेच्या पाणीपातळीत काही प्रमाणात वाढ होणार आहे. त्यामुळे कृष्णा नदीकाठास सतर्कतेचा इशारा दिला आहे.

अधिक वाचा: काजू खावी तशी चव लागणारी देशी शेंग; लक्ष्मीवाडीच्या शेतकऱ्यांचा भुईमूग लागवडीचा हटके पॅटर्न

Web Title: Koyna Dam Water Level : Krishna water level will increase again; Release increased from Koyna Dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.