Lokmat Agro >हवामान > Kolhapur Dam Water : पावसाची उघडीप; राधानगरी, तुळशी व वारणा धरणांत किती पाणीसाठा?

Kolhapur Dam Water : पावसाची उघडीप; राधानगरी, तुळशी व वारणा धरणांत किती पाणीसाठा?

Kolhapur Dam Water : Rainfall stop; How much water is stored in Radhanagari, Tulsi and Warna dams? | Kolhapur Dam Water : पावसाची उघडीप; राधानगरी, तुळशी व वारणा धरणांत किती पाणीसाठा?

Kolhapur Dam Water : पावसाची उघडीप; राधानगरी, तुळशी व वारणा धरणांत किती पाणीसाठा?

कोल्हापूर जिल्ह्यात गुरुवारी पावसाने विश्रांती घेतली. अधूनमधून पडणाऱ्या हलक्या सरी वगळता दिवसभर कडकडीत ऊन पडले होते. पावसाने विश्रांती घेतली असली तरी पंचगंगेच्या पाणी पातळीत घट झाली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात गुरुवारी पावसाने विश्रांती घेतली. अधूनमधून पडणाऱ्या हलक्या सरी वगळता दिवसभर कडकडीत ऊन पडले होते. पावसाने विश्रांती घेतली असली तरी पंचगंगेच्या पाणी पातळीत घट झाली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात गुरुवारी पावसाने विश्रांती घेतली. अधूनमधून पडणाऱ्या हलक्या सरी वगळता दिवसभर कडकडीत ऊन पडले होते. पावसाने विश्रांती घेतली असली तरी पंचगंगेच्या पाणी पातळीत घट झाली आहे.

अजूनही ३८ बंधारे पाण्याखाली आहेत. जिल्ह्यात तुरळक पाऊस असला तरी धरणातून विसर्ग सुरू असल्याने नद्यांचे पाणी संथगतीने कमी होत आहे. गुरुवारी रात्री ८ वाजेच्या माहितीनुसार पंचगंगा नदी सध्या २६.०९ फुटांवर पोहोचली आहे.

शहरासह जिल्ह्यात मंगळवारी सकाळपासून पावसाने चांगलीच विश्रांती घेतली. यामुळे शहरात सकाळपासूनच ऊन होते. जिल्ह्यात दोन दिवस तुरळक ठिकाणी पाऊस झाला.

गुरुवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी ५.३ मिलिमीटर इतकीच पावसाची नोंद झाली. सर्वाधिक ३२.७ मिलिमीटर पावसाची नोंद गगनबावडा तालुक्यात झाली.

पाऊस कमी असला तरी धरणातून विसर्ग कायम आहे. रात्रीत तीन फुटांनी वाढ झालेल्या पंचगंगेची पातळी दिवसभरात मात्र केवळ तीन इंचांनीच वाढली.

राधानगरीतून प्रति सेकंद ३१००, वारणातून ४५०० तर दधगंगातून १६०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नद्यांची पातळी संथगतीने कमी होत आहे. पंचगंगा नदीची पातळी दिवसभरात २६.०९ फुटापर्यंत पोहोचली.

दरम्यान, गुरुवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात १७ खासगी मालमत्तांची पडझड होऊन ५ लाख १० हजार रुपयांचे नुकसान झाले.

जिल्ह्यातील धरणसाठा (टीएमसीत)
राधानगरी - ६.८४
तुळशी - २.७५
वारणा - २८.२७
दूधगंगा - १७.२६
कासारी - २.००
कडवी - २.२०
कुंभी - २.०५
पाटगाव - ३.३२

अधिक वाचा: नवीन पीकविमा योजनेत सरकारची किती गुंतवणूक; फायदा सरकारला की कंपन्यांना? वाचा सविस्तर

Web Title: Kolhapur Dam Water : Rainfall stop; How much water is stored in Radhanagari, Tulsi and Warna dams?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.