Lokmat Agro >हवामान > खडकपूर्णा प्रकल्प 'ओव्हरफ्लो' १९ दरवाजे उघडले; खडकपूर्णा नदी काठच्या ३३ गावांना सतर्कतेचा इशारा

खडकपूर्णा प्रकल्प 'ओव्हरफ्लो' १९ दरवाजे उघडले; खडकपूर्णा नदी काठच्या ३३ गावांना सतर्कतेचा इशारा

Khadakpurna project 'overflow' 19 gates opened; Alert issued to 33 villages along Khadakpurna river | खडकपूर्णा प्रकल्प 'ओव्हरफ्लो' १९ दरवाजे उघडले; खडकपूर्णा नदी काठच्या ३३ गावांना सतर्कतेचा इशारा

खडकपूर्णा प्रकल्प 'ओव्हरफ्लो' १९ दरवाजे उघडले; खडकपूर्णा नदी काठच्या ३३ गावांना सतर्कतेचा इशारा

Khadakpurna Water Update : बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठा खडकपूर्णा प्रकल्प 'ओव्हरफ्लो' झाला असून, प्रकल्पाचे सर्व १९ गेट उघडण्यात आले आहेत. हे सर्व गेट सुमारे ६० सेंटिमीटर उंचीने उघडण्यात आले आहेत. त्यामुळे खडकपूर्णा नदीच्या काठावर असलेल्या ३३ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Khadakpurna Water Update : बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठा खडकपूर्णा प्रकल्प 'ओव्हरफ्लो' झाला असून, प्रकल्पाचे सर्व १९ गेट उघडण्यात आले आहेत. हे सर्व गेट सुमारे ६० सेंटिमीटर उंचीने उघडण्यात आले आहेत. त्यामुळे खडकपूर्णा नदीच्या काठावर असलेल्या ३३ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

शेअर :

Join us
Join usNext

बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठा खडकपूर्णा प्रकल्प 'ओव्हरफ्लो' झाला असून, प्रकल्पाचे सर्व १९ गेट उघडण्यात आले आहेत. हे सर्व गेट सुमारे ६० सेंटिमीटर उंचीने उघडण्यात आले आहेत. त्यामुळे खडकपूर्णा नदीच्या काठावर असलेल्या ३३ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

जिल्ह्यात सिंचनासह पाणीपुरवठ्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या संत चोखासागर प्रकल्पाच्या क्षेत्रात जोरदार पाऊस पडल्यामुळे जलसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. सध्या प्रकल्प १०० टक्के भरलेला आहे. प्रकल्पाचा प्रकल्पीय संचयित साठा ९३.४० दशलक्ष घनमीटर असून पूर्ण संचय पातळी ५२०.५० मीटर आहे.

सद्यस्थितीत जलाशयाची पातळी ५२९ मीटर आहे. प्रकल्पाचे पाणी शेजारील गावात शिरण्याची शक्यता असल्याने सर्व १९ दरवाजे ६० सेंटिमीटरने उघडून नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे. परिणामी, खडकपूर्णा नदीला पूर आला आहे.

नदीकाठच्या शेतात पाणी शिरले आहे. निमगाव गुरु तसेच परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात काढणीसाठी आलेली सोयाबीन, कपाशी व मकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

धोकादायक ठिकाणी जाण्यास मनाई

• महसूल विभागाच्या माहितीनुसार, खडकपूर्णा प्रकल्पाचे सर्व दरवाजे उघडले असल्याने नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तसेच धरण क्षेत्रात आणि नदीपात्रात पाऊस सुरू असल्यामुळे खडकपूर्णा नदीला पूर आला आहे. या काळात नदीकाठावरील तसेच इतर गावातील नागरिकांनी दक्षता घेणे गरजेचे आहे.

• पाळीव प्राणी आणि नदीकाठावरील वस्तू सुरक्षित ठिकाणी ठेवाव्यात. कोणालाही धोकादायक ठिकाणी जाण्याची परवानगी नाही. उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे आणि तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

गावांना सतर्कतेचा इशारा

नदीकाठावरील गावांमध्ये देऊळगाव राजा तालुक्यातील निमगाव गुरू, सावंगी टेकाळे, डिग्रस बुद्रुक, डिग्रस खुर्द, टाकरखेड वायाळ, टाकरखेड भागिले, सिंदखेड राजा तालुक्यातील निमगाव वायाळ, साठेगाव, हिवरखेड, राहेरी खुर्द, तडेगाव, राहेरी बुद्रुक, ताडशिवणी, देवखेड, पिंपळगाव कुंडा, लिंगा आणि लोणार तालुक्यातील खापरखेडा, रायगाव, सावरगाव तेली या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

लहान पूल वाहतुकीसाठी बंद

टाकरखेड भागातील देऊळगाव राजा-चिखली रोडवर पूल बांधण्यात आला होता. पोलिस प्रशासनाच्या बंदोबस्तात जुना पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून वाहनधारक पर्यायी पूल वापरत आहेत.

हेही वाचा : शेतीची वाट निवडली अन् एका रात्रीत उद्ध्वस्त झाली स्वप्नांची दुनिया; करंजीतील तरुण शेतकऱ्याचे हृदयद्रावक वास्तव

Web Title : खडकपूर्णा बांध ओवरफ्लो: गेट खुले, गांवों में बाढ़ का खतरा, चेतावनी जारी

Web Summary : खडकपूर्णा बांध ओवरफ्लो हो गया, सभी 19 गेट खोले गए। खडकपूर्णा नदी के किनारे स्थित 33 गांवों में बाढ़ का खतरा बढ़ गया है। भारी बारिश के कारण जल स्तर में वृद्धि हुई, जिससे फसलों को नुकसान पहुंचा। निवासियों को सतर्क रहने की सलाह दी गई है।

Web Title : Khadakpurna Dam Overflow: Gates Open, Villages Alerted to Flood Risk

Web Summary : Khadakpurna dam overflowed, opening all 19 gates. Thirty-three villages along the Khadakpurna River are alerted due to potential flooding. Heavy rains caused significant water level rise, damaging crops. Residents are urged to take precautions.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.