Jayakawadi Dam Water : मराठवाडा म्हटले की, आठराविश्व पाण्याचे संकट हे समीकरण झाले आहे. परंतू यंदा पर्जन्यमान चांगले झाल्यामुळे जायकवाडी धरणात (Jayakawadi Dam Water) ७१ टक्के पाणीसाठा उलब्ध असल्याने यंदा पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागणार नाही.
मराठवाड्यातील ८७९ प्रकल्पांत ६०.१६ टक्के पाणीसाठा आहे, ज्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात पाणी टंचाईची समस्या उद्भवणार नाही. विशेषतः यंदा जायकवाडी धरणात ७१ टक्के पाणीसाठा असून, सर्व मुख्य धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध आहे.
मराठवाड्यात पाणीसाठ्याची परिस्थिती उत्तम आहे. विभागातील ८७९ प्रकल्पांत ६०.१६ टक्के पाणीसाठा आहे. जायकवाडी धरणात ७१ टक्के पाणीसाठा (Jayakawadi Dam Water) असून, उन्हाळी पिकांसह पिण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध आहे, असे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले आहे. यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात मराठवाड्याला पाण्याच्या संकटाला सामोरे जावे लागणार नाही.
पाण्याच्या मागणीत वाढ
मराठवाड्यात आता उन्हाच्या तीव्र झळ्या जाणवत आहेत. वाढत्या उन्हासह पाण्याच्या मागणीत आणि वापरात वाढ होत आहे.
सद्यस्थितीत विभागातील धरणात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असल्यामुळे पाणी टंचाई फारशी जाणवणार नसल्याची स्थिती आहे.
मात्र, विभागातील लघु प्रकल्पांत कमी पाणी असल्यामुळे काही गावांना पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागणार आहे. सध्या ११ मोठ्या प्रकल्पात ७०.६० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.
७५ मध्यम प्रकल्पात ५३ टक्के तर ७५१ प्रकल्पात ३७.१३ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.
गोदावरी नदीवरील १५ बंधाऱ्यात २६.२७ टक्के पाणी आहे तर तेरणा, मांजरा, रेणा नदीवरील २७ प्रकल्पांत ८९ टक्के पाणीसाठा आहे. एकूण ८७९ प्रकल्पात ६०.१६ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे, असे जलसंपदा विभागाच्या अभियंत्यांनी दिली माहिती.
मराठवाड्यातील धरण पाणीसाठा
मोठ्या धरणात पुरेसा पाणीसाठा असून सर्वात मोठ्या जायकवाडी धरणात ७१ टक्के पाणीसाठा आहे. येलदरी ७९, सिद्धेश्वर ५५, माजलगाव ५५, मांजरा ७५, उर्ध्व पेनगंगा ७४, निम्न तेरणा ८१, निम्न मनार ६१, विष्णुपुरी ५३, निम्न दुधना ५२ आणि सिना कोळेगाव धरणात ६१ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १६ मध्यम प्रकल्पात ४७ टक्के पाणीसाठा आहे. जालना जिल्ह्यातील ७ प्रकल्पात ४० टक्के, बीडमधील १६ प्रकल्पात ५८ टक्के, लातूर जिल्ह्यातील ८ प्रकल्पात ५१ टक्के, धाराशिव जिल्ह्यातील १७ प्रकल्पात ५७ टक्के, नांदेड जिल्ह्यातील ९ प्रकल्पात ५९ टक्के आणि परभणी जिल्ह्यातील २ प्रकल्पात ५६ टक्के पाणीसाठा आहे.