Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >हवामान > उजनी धरणात मागील २४ तासांत आले किती पाणी? जाणून घ्या सविस्तर

उजनी धरणात मागील २४ तासांत आले किती पाणी? जाणून घ्या सविस्तर

How much water has flowed into Ujani Dam in the last 24 hours? Know in detail | उजनी धरणात मागील २४ तासांत आले किती पाणी? जाणून घ्या सविस्तर

उजनी धरणात मागील २४ तासांत आले किती पाणी? जाणून घ्या सविस्तर

Ujani Dam Water सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेले उजनी धरणाची पाणी पातळी स्थिर होत असून दिवसभरात १ टक्का वाढ झाली आहे.

Ujani Dam Water सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेले उजनी धरणाची पाणी पातळी स्थिर होत असून दिवसभरात १ टक्का वाढ झाली आहे.

टेंभुर्णी : सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेले उजनी धरणाचीपाणी पातळी स्थिर होत असून दिवसभरात १ टक्का वाढ झाली आहे.

तर दौंड येथील विसर्ग घट होत असून शुक्रवार दि. ३० रोजी सायंकाळी ६ वाजता ८ हजार ६३१ कुसेक विसर्ग उजनीत मिसळत आहे.

उजनी धरणाचीपाणी पातळी २१. ८३ टक्के झाली आहे. सकाळी ६ वाजता २०.५० टक्के होती. दिवसभरात केवळ १.३३ टक्के वाढून २१. ८३ टक्के झाली आहे. तर ११.७० टीएमसी उपयुक्त पाणी साठा झाला आहे.

एकूण पाणीसाठा ७५.३५ टीएमसी पाणी साठा झाला आहे. गेल्या १८ मेपासून उजनी धरणाची पाणी पातळी वाढत आहे. गेल्या दोन दिवसांपासून पाऊस थांबल्याने झपाट्याने वाढणारी उजनी धरणाची पाणी पातळी संथ गतीने झाली आहे.

गेल्या दोन दिवसात उजनी परिसरात पावसाची नोंद झाली नसून. १ जून २४ ते ३० मे २५ पर्यंत ८३९ मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे.

अधिक वाचा: शेतकऱ्यांनो फार्मर आयडी असेल तरच महाडीबीटी पोर्टलवरून करता येणार योजनांसाठी अर्ज

Web Title: How much water has flowed into Ujani Dam in the last 24 hours? Know in detail