Join us

पुढील २४ तासात राज्यात या ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 13:37 IST

Weather Update राज्यातील विविध भागात मान्सूनपूर्व वादळी पावसाचा जोर कायम असून सलगच्या पावसाने फळबागा आणि भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

पुणे: राज्यातील विविध भागात मान्सूनपूर्व वादळी पावसाचा जोर कायम असून सलगच्या पावसाने फळबागा आणि भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

पुढील २४ तासांसाठी राज्याच्या विविध भागांना जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस होत आहे.

२४ तासात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे जिल्ह्यांतील घाट विभाग, नांदेड, लातूर, बुलडाणा, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडेल.

यावेळी वाऱ्यांचा ताशी वेग ५० ते ६० इतका असेल. त्यामुळे या जिल्ह्यांना 'ऑरेंज' अलर्ट दिला आहे, तर अन्य जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडणार असून, या जिल्ह्यांना 'यलो' अलर्ट दिला आहे.

मराठवाड्याच्या विविध जिल्ह्यांत गेल्या आठ दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पाऊस होत आहे. त्यामुळे खरीप हंगामपूर्व शेती कामांत व्यत्यय निर्माण झाला आहे.

लातूर जिल्ह्यातील नऊ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. परिणामी, शेतकरी हतबल झाले आहेत. फळबागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

अधिक वाचा: आता शेतरस्ते होणार रुंद, महसूल विभागाने घेतला हा मोठा निर्णय; जाणून घ्या सविस्तर

टॅग्स :हवामान अंदाजपाऊसमहाराष्ट्रमराठवाडामराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकविदर्भकोकणशेतकरीशेतीमोसमी पाऊस