बुधवार दि. ३ सप्टेंबर (एकादशी) पासुन रविवार दि. ७ सप्टेंबर (पौर्णिमे) पर्यंतच्या पाच दिवसात संपूर्ण कोकण, विदर्भ व खान्देशसह नाशिक जिल्ह्यात व सह्याद्री घाटमाथ्यावर मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता जाणवते.
विशेषतः मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, उत्तर छत्रपती संभाजीनगर, अमरावती, अकोला, नागपूर, भंडारा, गोंदिया ह्या जिल्ह्यात पावसाचा प्रभाव अधिक जाणवू शकतो.
सोमवार दि. ८ सप्टेंबर ते शुक्रवार दि. १२ सप्टेंबर च्या पाच दिवसात पूर्व विदर्भ वगळता, मुंबई व संपूर्ण कोकण सहित उर्वरित महाराष्ट्रात उघडीपीची शक्यता जाणवते.
शनिवार दि. १३ सप्टेंबर ते २० सप्टेंबर दरम्यानच्या आठ दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा दमदार पावसाची शक्यता जाणवते. असा अंदाज हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी दिला आहे.
अधिक वाचा: दस्तनोंदणी कार्यालयामधील कामकाजाला येणार वेग; नोंदणी झालेला दस्त विनाविलंब स्कॅन करून मिळणार