सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरील जिल्ह्यात विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी, गगनबावडा, राधानगरी, चंदगड तालुक्याच्या आणि सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, जावळी, पाटण तालुक्यातील क्षेत्रात आणि लगतच्या परिसरात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.
आज, सोमवारपासून आठवडाभर म्हणजे पुढील सोमवारपर्यंत (दि. २८) मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता निवृत्त हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, सह्याद्रीच्या पूर्वेकडील घाटा खालील पर्जन्यछायेचा प्रदेशातील जिल्ह्यातील तालुक्यात २१ ते २८ जुलै यादरम्यान मात्र तुरळक ठिकाणीच किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. सोमवारपासून (दि. २१) पावसाचे वातावरण आहे. मात्र पावसाची शक्यता कमी असेल असा अंदाज आहे.
सरासरीपेक्षा अधिक पावसाची पूर्तता
येणाऱ्या १० दिवसांत पडणाऱ्या मध्यम ते जोरदार पावसामुळे जुलै महिन्यात सरासरीपेक्षा अधिक असा व्यक्त केलेल्या मासिक पावसाच्या अंदाजाची पूर्तता होण्याची शक्यता जाणवते.
जल आवक, धरणे संचय साठा
घाटमाथ्यावर उगम पावणाऱ्या कृष्णा-कोयना, पंचगंगा, वारणा, दुधगंगा आणि भोगावती नद्यांच्या खोऱ्यात मध्यम ते जोरदार पावसाच्या शक्यतेमुळे या नद्यांना पूर येण्याची शक्यता आहे. २१ ते २८ जुलैच्या आठवड्यात धरणेही त्याच्या सर्वाधिक जलसाठ्याकडे झेपावण्याची शक्यता आहे.
अधिक वाचा: तुकड्यांतील जमीन नियमित करण्यासाठी नऊ सदस्यांची समिती स्थापन; १५ दिवसांत निर्णय देणार