Lokmat Agro >हवामान > राज्याच्या 'या' विभागाला पुढील २४ तासांत जोरदार पावसाचा इशारा; नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

राज्याच्या 'या' विभागाला पुढील २४ तासांत जोरदार पावसाचा इशारा; नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

Heavy rain warning issued for 'this' part of the state in the next 24 hours; Citizens urged to remain alert | राज्याच्या 'या' विभागाला पुढील २४ तासांत जोरदार पावसाचा इशारा; नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

राज्याच्या 'या' विभागाला पुढील २४ तासांत जोरदार पावसाचा इशारा; नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

Maharashtra Weather Update : यंदा पांडुरंगाच्या दर्शनाला जाणाऱ्या वारकऱ्यांना क्वचितच पावसाने घेरले मात्र आता वारकऱ्यांच्या संगतीने राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होत असून येत्या २४ ते ४८ तासांत विदर्भात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. (Vidarbha Rain Alert)

Maharashtra Weather Update : यंदा पांडुरंगाच्या दर्शनाला जाणाऱ्या वारकऱ्यांना क्वचितच पावसाने घेरले मात्र आता वारकऱ्यांच्या संगतीने राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होत असून येत्या २४ ते ४८ तासांत विदर्भात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. (Vidarbha Rain Alert)

शेअर :

Join us
Join usNext

यंदा पांडुरंगाच्या दर्शनाला जाणाऱ्या वारकऱ्यांना क्वचितच पावसाने घेरले मात्र आता वारकऱ्यांच्या संगतीने राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होत असून येत्या २४ ते ४८ तासांत चंद्रपूर व गडचिरोलीसहविदर्भात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

विभागाने याबाबत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पूर्व विदर्भात दोन दिवस शांत राहिलेले ढग मुसळधार बरसण्याची शक्यता आहे. ईशान्य अरबी समुद्रात सध्या कुंड तयार झाला आहे, जो पश्चिम बंगालमध्ये गंगेच्या खोऱ्यात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्टयाकडे सरकत आहे.

तिथून उत्तर गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड व झारखंड होत दक्षिणेकडे सरकत आहे. या प्रभावानेच ७ जुलै रोजी चंद्रपूर, गडचिरोली व गोंदियात अत्याधिक जोराचा पाऊस होईल, असा वेधशाळेचा अंदाज आहे. याशिवाय नागपूर, भंडारा, वर्धा व अमरावती जिल्ह्यात अतिजोरदार पावसाची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.

त्यानंतर ८ जुलै रोजी नागपूर, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात अतिजोरदार पावसाचे सत्र कायम राहील, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. सोबत विजा व ढगांचा जोरात गडगडाट होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा वेधशाळेने दिला आहे.

पश्चिम विदर्भात समाधानकारक पाऊस

• पूर्व विदर्भात दोन दिवस ढग शांत राहिले. चंद्रपूरला रविवारी सकाळपर्यंत पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. गोंदिया जिल्ह्यात तुरळक पावसाची हजेरी लागली. नागपूर, वर्धा, भंडारा, गडचिरोली भागात हलकी रिपरिप झाली.

• पश्चिम विदर्भात मात्र चांगल्या सरी बरसल्या. रात्री अकोला ३० मि.मी., अमरावती १०.६ मि.मी., यवतमाळ १५.५ मि.मी. चांगला पाऊस झाला. यवतमाळला रविवारी दिवसाही १८ मि.मी. पावसाची नोंद झाली. बुलढाणा जिल्ह्यातही २१ मि.मी. नोंदीसह जोरात पाऊस झाला.

हेही वाचा : काही धरणे ओव्हरफ्लो तर काहींत थेंबभर सुद्धा आवक नाही; वाचा राज्यातील पाणीसाठ्याची अद्ययावत माहिती

Web Title: Heavy rain warning issued for 'this' part of the state in the next 24 hours; Citizens urged to remain alert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.