Lokmat Agro >हवामान > 'सीना-भोगावती'ला पूर; मलिकपेठ, अनगर, बोपले, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली

'सीना-भोगावती'ला पूर; मलिकपेठ, अनगर, बोपले, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली

Flood in 'Sina-Bhogavati'; Malikpeth, Angar, Bople, Kolhapur type dams under water | 'सीना-भोगावती'ला पूर; मलिकपेठ, अनगर, बोपले, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली

'सीना-भोगावती'ला पूर; मलिकपेठ, अनगर, बोपले, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली

सीना नदीच्या खोऱ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने व सीना कोळगाव प्रकल्पामधून सीना नदीत पाणी सोडले आहे. ती दुथडी भरून वाहू लागली आहे. मोहोळ तालुक्यातील मलिकपेठ, अनगर, बोपले, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

सीना नदीच्या खोऱ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने व सीना कोळगाव प्रकल्पामधून सीना नदीत पाणी सोडले आहे. ती दुथडी भरून वाहू लागली आहे. मोहोळ तालुक्यातील मलिकपेठ, अनगर, बोपले, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

सीना नदीच्या खोऱ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने व सीना कोळगाव प्रकल्पामधून सीना नदीतपाणी सोडले आहे. ती दुथडी भरून वाहू लागली आहे. सोलापूर जिल्ह्याच्या मोहोळ तालुक्यातील मलिकपेठ, अनगर, बोपले, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

या पुरामुळे नदीकाठच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. भोगावती व नागझरी नदीच्या खोऱ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने आणि ढाळे पिंपळगाव मध्यम प्रकल्प व हिंगणी मध्यम प्रकल्प पाण्याने शंभर टक्के भरले आहे. भोगावती नदीलाही मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे.

पावसाळा सुरू झाल्यापासून मोहोळ तालुक्याच्या उत्तर भागात पावसाचे प्रमाण कमी आहे. सीना व भोगावती या दोन नद्या जात आहेत. या दोन्ही नद्यांच्या खोऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने दुथडी वाहत आहेत.

तसेच भोगावती नदीच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने भोगावती नदीलाही पाणी आले आहे. या पूर परस्थितीमुळे शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे. सरकारने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे तातडीने करून त्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

हेही वाचा : वहिवाट, शेतरस्ता होणार मोकळा होणार; शेतकऱ्यांना मोफत पोलिस बंदोबस्त देण्याबाबत गृह विभागाचा मोठा निर्णय

Web Title: Flood in 'Sina-Bhogavati'; Malikpeth, Angar, Bople, Kolhapur type dams under water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.