Dam Water Storage : राज्यात तापमानाचा पारा सतत वाढत असताना राज्यातील मोठ्या, मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये ५२.५ टक्के जलसाठा शिल्लक (Dam Water Storage) आहे. सध्या धरणांमध्ये असलेला पाणीसाठा किमान जुलैपर्यंत पुरवण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.
यंदा बाष्पीभवन वाढल्याने जलसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. विशेष म्हणजे, मागीलवर्षी यावेळी धरणांमध्ये ४२.९४ टक्के जलसाठा शिल्लक होता. राज्यात अनेक ठिकाणी पारा ४० अंश सेल्सिअसवर गेला आहे. (Dam Water Storage)
हवामान बदलामुळे सरासरी तापमानात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे प्रत्येक वर्षी तापमानाचे नवे उच्चांक गाठत आहे. विदर्भात काही ठिकाणी पारा ४७ अंश सेल्सिअसपर्यंत जातो. कडक उन्हामुळे धरणांमधील पाण्याचे बाष्पीभवनदेखील वेगाने होत आहे. त्यामुळे सध्या असलेला पाणीसाठा मे महिन्यात झपाट्याने कमी होताना दिसेल. (Dam Water Storage)
...तर टँकरचा आधार
ज्या गावांमध्ये विहिरी, कूपनलिकेने नागरिकांना पाणीपुरवठा होत आहे, त्या गावांतील विहिरी, कूपनलिका आटल्या आहेत. त्यामुळे राज्यातील १० गावे व २५ वाड्यांमध्ये १९ टँकरने पाणीपुरवठा सुरू असल्याचे ३ मार्चच्या अहवालात सांगण्यात आले. ही संख्या मागीलवर्षीच्या तुलनेत खूप कमी आहे. येत्या तीन महिन्यांत पाणीटंचाईची झळ निर्माण होण्याची शक्यता आहे. (Dam Water Storage)
...तोपर्यंत पाणी जपूनच वापरावे लागेल
राज्यात कोकणात साधारणतः जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचे आगमन होते. संपूर्ण राज्य व्यापण्यासाठी मान्सूनला जूनअखेरपर्यंतचा कालावधी लागतो. धरणांमधील पाणीसाठा वाढण्यास जुलैमध्ये सुरुवात होते. तोपर्यंत पाणी जपूनच वापरावे लागते. (Dam Water Storage)
शिल्लक पाणीसाठा
मध्यम प्रकल्प | ५३.४२ टक्के |
मोठे प्रकल्प | ४२.०६ टक्के |
लघु प्रकल्प | ९.९९ टक्के |