lokmat Supervote 2024
Lokmat Agro >हवामान > मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी; अखेर नाशिक, नगरहून जायकवाडीसाठी पाणी सोडणार

मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी; अखेर नाशिक, नगरहून जायकवाडीसाठी पाणी सोडणार

Dam water discharge for Jayakwadi dam from Nashik and Nagar Dam | मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी; अखेर नाशिक, नगरहून जायकवाडीसाठी पाणी सोडणार

मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी; अखेर नाशिक, नगरहून जायकवाडीसाठी पाणी सोडणार

जायकवाडी धरणात नाशिक व नगरमधील उर्ध्व प्रकल्पांतून पाणी सोडण्याचे तातडीचे आदेश जलसंपदा विभागाने दिले आहेत.

जायकवाडी धरणात नाशिक व नगरमधील उर्ध्व प्रकल्पांतून पाणी सोडण्याचे तातडीचे आदेश जलसंपदा विभागाने दिले आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

उर्ध्व गोदावरी खोऱ्यातील धरणसमुहातीलपाणी पैठण धरणात सोडण्यासाठीचे कार्यालयीन आदेश ई-मेल काढण्यात आले असून त्यानुसार नाशिक व नगरमधील गंगापूर, गोदावरी-दारणा, मुळा, प्रवरा, निळवंडे धरणातील ८.६ टीएमसी पाणी मराठवाड्यातील जायकवाडी धरणात सोडण्यात येणार आहे. त्यामुळे मराठवाड्यातील पाणीटंचाईवर दिलासा मिळणार आहे. दरम्यान या संदर्भात आज जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीने बैठक सुरू असून पाणी सोडण्यावर कार्यवाही करण्यासंदर्भात नियोजन सुरू असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी ‘लोकमत ॲग्रो’ला दिली आहे.

कुठल्या धरणातून किती पाणी

या शासन आदेशानुसार मुळा (मांडओहोळ व मुळा) प्रकल्पातून २.१० टीएमसी, प्रवरा (भंडारदरा, निळवंडे, आढळा, भोजापूर)प्रकल्पातून ३.३६ टीएमसी, गंगापूर धरणातून (गोदावरी, काश्यपी, गौतमी गोदावरी), ०.५ टीएमसी, गोदावरी दारणा (आळंदी, कडवा, भाम, भावली, वाकी, दारणा, मुकणे, वालदेवी) प्रकल्पातून २.६४३ टीएमसी असे एकूण ८.६०३ टीएमसी पाणी जायकवाडीत सोडण्यात येणार आहे.

हेही वाचा : नगर-नाशिकहून जायकवाडीसाठी सोडावे लागणार ११ ते १३ टीएमसी पाणी, कारण...

प्रशासनाची तयारी

तातडीच्या या आदेशामुळे जलसंपदासह पोलीस व प्रशासनाची धावपळ होणार असून पुरेसा पोलिस बंदोबस्त ठेवणे, वीजपुरवठा बंद करणे, संबंधित जिल्ह्याच्या प्रशासनाला कळविणे अशा बाबींसह आवश्यक कारवाई ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करायची असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. असे असले तरी प्रत्यक्षात पाणी कधी सोडणार? त्याची तारीख आज दिनांक ३० ऑक्टोबरच्या जलसंपदा विभागाच्या बैठकीनंतर ठरेल व येत्या तीन ते चार दिवसात त्याची अंमलबजावणी होईल, अशी शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.

अशी आहे पार्श्वभूमी

सन 2023 करिता उर्ध्व भागातील धरण समुहातून पैठण धरणासाठी पाणी सोडण्याच्या अनुषंगाने दि. 17/10/2023 रोजी कार्यकारी संचालक, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, छत्रपती संभाजीनगर यांचे दालनात सर्व सबंधित अधिकारी यांची बैठक घेण्यात आली.

बैठकीत सादर केलेल्या पाण्याच्या आकडेवारीनुसार, मुख्य लेखापरिक्षक, जल व सिंचन महाराष्ट्र राज्य, वाल्मी परीसर, छत्रपती संभाजीनगर तथा अध्यक्ष स्थायी समिती (Supervisory Standing Committee) यांनी संदर्भ क्र. 9 अन्वये अहवाल सादर केला होता.

त्यानुसार जायकवाडी धरणातील दि. 17/10/2018 रोजीचा प्रत्यक्ष पाणीसाठा 1023.48 द.ल.घ.मी. असून खरीप हंगामातील पाणीवापर 219.424 द.ल.घ.मी. एवढा होता. खरीप पाणीवापरासह एकुण उपलब्ध झालेले पाणी 1242.904 द.ल.घ.मी होता. त्याची संकल्पीत पाणीसाठयाशी टक्केवारी 57.25 टक्के एवढी होती.

सद्य:स्थितीत ही टक्केवारी विचारात घेता समन्यायी पाणी वाटपासाठी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण यांनी त्यांच्या दि. 19/09/2014 च्या आदेशातील तक्ता क्र. 6 (Table no. 6) मध्ये दिलेल्या निर्देशातील Strategy (जायकवाडी धरण 65% पेक्षा कमी) लागू होते, असा निष्कर्ष काढण्यात आला व उर्ध्व धरणांतून किती पाणी सोडायचे याची आकडेवारी ठरविण्यात आली.

Web Title: Dam water discharge for Jayakwadi dam from Nashik and Nagar Dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.