Lokmat Agro >हवामान > चांदोली धरणाचे चारही वक्राकार दरवाजे बंद; वीजनिर्मिती केंद्रातून मात्र विसर्ग १६३० क्युसेकने सुरू

चांदोली धरणाचे चारही वक्राकार दरवाजे बंद; वीजनिर्मिती केंद्रातून मात्र विसर्ग १६३० क्युसेकने सुरू

All four curved gates of Chandoli Dam closed; however, discharge from the power generation station has resumed at 1630 cusecs | चांदोली धरणाचे चारही वक्राकार दरवाजे बंद; वीजनिर्मिती केंद्रातून मात्र विसर्ग १६३० क्युसेकने सुरू

चांदोली धरणाचे चारही वक्राकार दरवाजे बंद; वीजनिर्मिती केंद्रातून मात्र विसर्ग १६३० क्युसेकने सुरू

Chandoli Dam Water Update : शिराळा तालुक्यासह वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चार दिवसांपासून पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. चोवीस तासांत पाथरपुंज येथे २९, निवळे १७, धनगरवाडा १३, चांदोली ६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे धरणात पाण्याची आवक २७७४ क्युसेकने सुरू आहे.

Chandoli Dam Water Update : शिराळा तालुक्यासह वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चार दिवसांपासून पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. चोवीस तासांत पाथरपुंज येथे २९, निवळे १७, धनगरवाडा १३, चांदोली ६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे धरणात पाण्याची आवक २७७४ क्युसेकने सुरू आहे.

शेअर :

Join us
Join usNext

सांगली जिल्ह्याच्या शिराळा तालुक्यासह वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चार दिवसांपासून पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. चोवीस तासांत पाथरपुंज येथे २९, निवळे १७, धनगरवाडा १३, चांदोली ६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे धरणात पाण्याची आवक २७७४ क्युसेकने सुरू आहे.

त्यामुळे धरणाचे चारही स्वयंचलित दरवाजे आज शनिवारी सकाळी अकरा वाजता बंद करण्यात आले असून, वीजनिर्मिती केंद्रातून विसर्ग १६३० क्युसेकने सुरू आहे. त्यामुळे वारणा नदीच्या पाणीपातळी कमी होत आहे. पाथरपुंजने चार हजार मिमी पार केला आहे.

चांदोली धरण परिसरात सकाळी आठ वाजेपर्यंत २४ तासांत ६ मिमी पाऊस झाला आहे. चांदोली धरणात आजअखेर २८.३८ टीएमसी म्हणजे ८२.५१ टक्के पाणीसाठा झाला आहे. धरणाची ६२०.६० मीटर पाणी पातळी आहे.

धरणात २७७४ क्युसेकने पाण्याची आवक सुरू आहे. गतवर्षी धरणात २९.६० टीएमसी पाणीसाठा होता. सततच्या पावसामुळे नदीकाठावरील शेतातील पिके वारणा सहा दिवसांपासून पाण्याखाली गेली आहेत. गेल्या दोन दिवसांपासून पावसाने तालुक्यात बऱ्यापैकी उघडीप दिली आहे. त्यामुळे पुन्हा शेतकरी शेतीची कामे करण्यात व्यस्त आहेत.

चांदोली धरण पाणलोट क्षेत्रातील पावसाची नोंद मिलिमीटरमध्ये

पाथरपुंज - २९ मिमी (४५३२)
निवळे - १७ (३६९५)
धनगरवाडा - १३ (२३०३)
चांदोली - ६ (२११३)

मंडलनिहाय पडलेला पाऊस व कंसात यावर्षी व गतवर्षीचा पाऊस मिमीमध्ये

शिराळा - ३.५० ( ५११.००)
शिरशी - ४.८० (७६४.२०)
मांगले - ३.५० (५०४.६०)
सागाव  - ४.५० (६१९.८०)
चरण - ७ (१६२०.८०)
वारणावती - ६ (२०५७)
कोकरूड - ५ (१०२९.८०)

हेही वाचा : अवर्षणाच्या फेऱ्यात मिळाली रेशीम शेतीची भक्कम साथ; कुप्पाच्या शेतकऱ्याने ७० गुंठ्यांत घेतले दहा लाखांचे उत्पन्न

Web Title: All four curved gates of Chandoli Dam closed; however, discharge from the power generation station has resumed at 1630 cusecs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.