Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >लै भारी > ना कोणते खत, ना माती तरीही पिकतेय दर्जेदार लालचुटुक स्ट्रॉबेरी; वाचा संपतरावांच्या शेतीची कहाणी

ना कोणते खत, ना माती तरीही पिकतेय दर्जेदार लालचुटुक स्ट्रॉबेरी; वाचा संपतरावांच्या शेतीची कहाणी

No fertilizer, no soil, yet quality, luscious strawberries are grown; Read the story of Sampatrao's farm | ना कोणते खत, ना माती तरीही पिकतेय दर्जेदार लालचुटुक स्ट्रॉबेरी; वाचा संपतरावांच्या शेतीची कहाणी

ना कोणते खत, ना माती तरीही पिकतेय दर्जेदार लालचुटुक स्ट्रॉबेरी; वाचा संपतरावांच्या शेतीची कहाणी

महाबळेश्वर म्हटलं की डोळ्यांसमोर येते ती तांबडी माती आणि रसाळ, लालचुटुक स्ट्रॉबेरी. मात्र, आता याच स्ट्रॉबेरीच्या मळ्यात विज्ञानाची जोड देऊन एक अभिनव प्रयोग यशस्वी झाला आहे.

महाबळेश्वर म्हटलं की डोळ्यांसमोर येते ती तांबडी माती आणि रसाळ, लालचुटुक स्ट्रॉबेरी. मात्र, आता याच स्ट्रॉबेरीच्या मळ्यात विज्ञानाची जोड देऊन एक अभिनव प्रयोग यशस्वी झाला आहे.

सचिन काकडे
सातारा : महाबळेश्वर म्हटलं की डोळ्यांसमोर येते ती तांबडी माती आणि रसाळ, लालचुटुक स्ट्रॉबेरी. मात्र, आता याच स्ट्रॉबेरीच्या मळ्यात विज्ञानाची जोड देऊन एक अभिनव प्रयोग यशस्वी झाला आहे.

तालुक्यातील कासवंड येथील प्रगतशील शेतकरी संपत पवार यांनी परंपरागत मातीतील शेतीला फाटा देत, चक्क कोकोपीट म्हणजेच नारळाची भुकटी वापरून स्ट्रॉबेरीचे यशस्वी उत्पादन घेतले आहे.

त्यांच्या या प्रयोगामुळे महाबळेश्वरच्या कृषी क्षेत्रात हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाचा एक नवा आयाम जोडला गेला आहे. स्ट्रॉबेरी हे मूळचे विदेशी फळ असले तरी ब्रिटिश काळापासून ते महाबळेश्वरच्या तांबड्या मातीत स्थिरावले आहे.

येथील हवामान या पिकासाठी पोषक असल्याने आज हेच फळ स्थानिकांच्या उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन बनले आहे. मात्र, बदलत्या निसर्गामुळे मातीतील शेती करणे आता खर्चिक ठरू लागले आहे.

हीच अडचण ओळखून संपत पवार यांनी गेल्या काही वर्षांपासून १५ गुंठे क्षेत्रांत मातीविना स्ट्रॉबेरी लागवडीचा यशस्वी प्रयोग राबवला आहे.

अशी केली जाते मातीविना शेती
◼️ या शेतीसाठी मातीऐवजी नारळाच्या भुकटीचे बेड तयार केले जातात.
◼️ कोकोपीटमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता चांगली असते.
◼️ यानंतर इटलीवरून आयात केलेल्या मदर प्लांटपासून विशेष पद्धतीने डॉटर प्लांट तयार केले जातात.
◼️ हे डॉटर प्लांटची पुढे लागवड केली जाते. जून-जुलै हा लागवडीचा महिना असतो.
◼️ नोव्हेंबर, डिसेंबरपासून रोपांचा फळे येण्यास सुरुवात होते.
◼️ रोपांना जगवण्यासाठी मातीतून मिळणारी मूलद्रव्ये पाण्याच्या माध्यमातून थेट मुळांपर्यंत पोहोचवली जातात.
◼️ प्रामुख्याने नाभीला, पार्थिनो आणि कामारोजा यांसारख्या उच्च दर्जाच्या जातींची लागवड केली जाते.
◼️ त्यामुळे शेतकऱ्यांना कमी कष्टात मोठे उत्पादन घेता येते.

पाण्याची बचत, खर्च कमी
◼️ हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाचे अनेक फायदे आहेत.
◼️ मातीतील शेतीला नैसर्गिक आपत्ती, जमिनीतील किडीचा धोका असतो.
◼️ ज्यासाठी महागड्या कीटकनाशकांचा वापर करावा लागतो.
◼️ मात्र, कोकोपीटच्या वापरामुळे हा खर्च अत्यल्प होतो.
◼️ या पद्धतीत २० टक्के पाण्याची बचत होते.
◼️ एकदा वापरलेले कोकोपीट किमान पाच वर्षे पुन्हा वापरता येते, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या भांडवली खर्चात मोठी घट होते

रंग, रूप आणि चवही तशीच
◼️ मातीशिवाय उत्पादित केलेल्या फळाची चव वेगळी असू शकते.
◼️ मात्र, संपत पवार यांनी हा समज खोटा ठरवला आहे.
◼️ या पद्धतीने उत्पादित होणाऱ्या स्ट्रॉबेरीचा रंग, आकार आणि चव ही जमिनीतील स्ट्रॉबेरीप्रमाणेच उत्कृष्ट असते.
◼️ जून-जुलैमध्ये होणारी लागवड ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये फळांच्या उत्पादनासाठी सज्ज होते.
◼️ या स्ट्रॉबेरीला बाजारपेठेतही मोठी मागणी आहे.

बदलत्या हवामानात शाश्वत शेती करण्यासाठी आता तंत्रज्ञानाची जोड देणे आवश्यक आहे. हायड्रोपोनिकमुळे मजुरीचा आणि खतांचा खर्च वाचतो. हे तंत्रज्ञान महाबळेश्वरमधील शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने नवसंजीवनी ठरणार आहे. - संपत पवार, प्रगतशील शेतकरी, कासवंड

अधिक वाचा: कासवंड गावची 'रास्पबेरी' शेतीत क्रांती; शेतकरी करतायत एकरी साडेचार ते पाच लाखांची कमाई

Web Title : बिना मिट्टी स्ट्रॉबेरी की खेती: संपत पवार की अभिनव कृषि कहानी

Web Summary : कसवांड, महाराष्ट्र के किसान संपत पवार ने मिट्टी के बजाय कोकोपीट का उपयोग करके सफलतापूर्वक स्ट्रॉबेरी की खेती की। यह हाइड्रोपोनिक तकनीक पानी बचाती है, लागत कम करती है, और उच्च गुणवत्ता वाले, स्वादिष्ट स्ट्रॉबेरी का उत्पादन करती है। यह पारंपरिक मिट्टी आधारित खेती में चुनौतियों का सामना करने वाले किसानों के लिए एक स्थायी समाधान प्रदान करता है।

Web Title : Soil-less Strawberry Farming Success: Sampat Pawar's Innovative Agriculture Story

Web Summary : Sampat Pawar, a farmer from Kaswand, Maharashtra, successfully cultivates strawberries using cocopeat instead of soil. This hydroponic technique saves water, reduces costs, and yields high-quality, flavorful strawberries. It offers a sustainable solution for farmers facing challenges with traditional soil-based farming.