Lokmat Agro >लै भारी > अँटी हेलनेट तंत्राचा वापर करत माजी सैनिक वसंतराव यांनी केला उन्हाळी मिरची उत्पादनाचा विक्रम

अँटी हेलनेट तंत्राचा वापर करत माजी सैनिक वसंतराव यांनी केला उन्हाळी मिरची उत्पादनाचा विक्रम

Ex military soldier Vasantrao sets record for summer chilli production using anti-helnet technique | अँटी हेलनेट तंत्राचा वापर करत माजी सैनिक वसंतराव यांनी केला उन्हाळी मिरची उत्पादनाचा विक्रम

अँटी हेलनेट तंत्राचा वापर करत माजी सैनिक वसंतराव यांनी केला उन्हाळी मिरची उत्पादनाचा विक्रम

कृषी क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाचा योग्य वापर, बाजारपेठेतील मागणी आणि पुरवठ्याचा अचूक अंदाज घेत शेती केली, तर शेतकरी सहज लखपती होऊ शकतो.

कृषी क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाचा योग्य वापर, बाजारपेठेतील मागणी आणि पुरवठ्याचा अचूक अंदाज घेत शेती केली, तर शेतकरी सहज लखपती होऊ शकतो.

शेअर :

Join us
Join usNext

गजानन पाटील
दरीबडची: कृषी क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाचा योग्य वापर, बाजारपेठेतील मागणी आणि पुरवठ्याचा अचूक अंदाज घेत शेती केली, तर शेतकरी सहज लखपती होऊ शकतो. याचे उदाहरण म्हणजे येळवी येथील वसंतराव पवार यांचे होय.

येळवी (ता.जत) येथील प्रयोगशील शेतकरी, माजी सैनिक वसंतराव पवार यांनी रखरखत्या उन्हात अँटी हेलनेटचा वापर करत, दोन एकर उन्हाळी मिरची लागवड केली आहे.

किमान ७५ ते ८० टन उत्पादन होईल, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. आहे. खर्च वगळता २० लाखांचा नफा अपेक्षित आहे. माळरानावर वसंतराव पवार हे नवनवीन यशस्वी प्रयोग करत आहेत.

माळरानावर नावीन्यपूर्ण मोगरा फुलशेती, भाजीपाला, मक्याचे उच्चांकी उत्पन्न त्यांनी घेतले आहे. मिरचीतून विक्रमी उत्पन्न घेण्याचा त्यांचा संकल्प केला.

मुलगा रविकिरण पवार, सूरज पवार यांनी दोन एकरांत एनएस २१११ वाणाच्या मिरचीची लागवड केली. लागवड करताना झाडामध्ये व्यवस्थित अंतर ठेवले.

रांगेतील अंतर पाच फूट आणि दोन रोपांमधील अंतर तीन फूट ठेवले. खताचे, पाण्याचे योग्य नियोजन केले. जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढविले. हिरवळीच्या खताबरोबर, शेणखत आणि गांडूळ खत वापरण्यात आले.

सात फूट अंतरावर मल्चिंगचे बेड (गादीवाफे) सोडण्यात आले. तण व्यवस्थापनासाठी मल्चिंगचा वापर केल्याने खर्चात बचत झाली. मार्च, एप्रिल, मे मधील वाढत्या उन्हाचा फटका बसू नये, म्हणून शेडनेट न वापरता उन्हापासून संरक्षण करणारे अँटी हेलनेट उभारले.

तालुक्यात प्रथमच उन्हाळ्यात भाजीपाल्यासाठी सूर्यकिरणांपासून बचाव करण्यासाठी अच्छादन कागद वापरला आहे. अँटी हेलनेटमुळे मिरचीच्या झाडांना थेट झळा पोहचत नाही.

४ जानेवारीला मिरचीची लागवड केली. मिरचीच्या झाडाची वाढ पाच फुटांपर्यंत झाली आहे. विद्राव्य खतांबरोबर सेंद्रिय, जीवामृताचा वापर केला आहे.

लागवडीनंतर दीड महिन्यानंतर मिरचीचा बहर सुरू झाला सूर्यकिरणांपासून बचाव करण्यासाठी अच्छादन कागद वापरला आहे. अँटी हेलनेटमुळे मिरचीच्या झाडांना थेट झळा पोहचत नाही. ४ जानेवारीला मिरचीची लागवड केली.

मिरचीच्या झाडाची वाढ पाच फुटांपर्यंत झाली आहे. विद्राव्य खतांबरोबर सेंद्रिय, जीवामृताचा वापर केला आहे. लागवडीनंतर दीड महिन्यानंतर मिरचीचा बहर सुरू झाला.

शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला फाटा देऊन नव्या वाटा शोधाव्यात. योग्य व्यवस्थापन, आधुनिक तंत्रज्ञानाची जोड द्यावी. दुष्काळी भागात भाजीपाला शेती सध्या फायदेशीर ठरते आहे. - वसंतराव पवार, प्रयोगशील शेतकरी

अधिक वाचा: बियाणे घरचे असो अथवा विकतचे, पेरणी अगोदर ही सोपी तपासणी कराच? वाचा सविस्तर

Web Title: Ex military soldier Vasantrao sets record for summer chilli production using anti-helnet technique

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.