पिके घेताना जमिनीतील क्षाराची तपासणी करणे गरजेचे असते. तरच आपल्याला पिकांपासून चांगले उत्पादन मिळू शकते. त्यातच जमिनीत क्षार वाढण्याची काही कारणे आहेत, तीही समजून घेतली पाहिजेत.
शेतकऱ्यांनी शक्यतो दोन ते तीन वर्षांनी माती परीक्षण करून मातीतील क्षारांचे प्रमाण किती आहे हे समजून घेऊन त्याप्रमाणे व्यवस्थापन करणे खूप महत्त्वाचे आहे. अन्यथा जमिनीत क्षारांचे प्रमाण वाढून जमीन चोपण होण्याचा धोका असतो.
यासाठीचा उपाय म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त क्षार आढळून आलेल्या क्षेत्रातील शेतकऱ्यांनी एकत्रितपणे जमिनीतील पाणी बाहेर काढण्यासाठी बंदिस्त चरांची योजना (निचरा प्रणाली) करून जमिनीतील अतिरिक्त पाणी बाहेर काढावे.
क्षार वाढण्याची कारणे
◼️ पिकांना क्षारयुक्त पाण्याचा वापर.
◼️ पिकांना अयोग्य पद्धतीने पाणी देणे.
◼️ जमिनीमधील पाण्याचा निचरा कमी होणे.
◼️ रासायनिक खतांचा असंतुलित अथवा अतिवापर.
जमिनीत क्षाराचे प्रमाण कमी करण्यासाठी उपाय
◼️ जमिनीतील निचरा सुधारणे आवश्यक.
◼️ जमिनीमध्ये सेंद्रिय खतांचा वापर वाढवणे गरजेचे.
◼️ क्षार वाढलेल्या क्षेत्रांमध्ये तीन वर्षांतून एकदा सबसॉयलरचा (मोल नांगरचा) वापर करून खोल नांगरट.
◼️ पिकांना पाणी देताना चांगल्या पाण्याचा वापर.
◼️ सूक्ष्म सिंचन पद्धतीचा अवलंब.
◼️ आवश्यकता वाटल्यास जमिनीमध्ये चर खोदून जास्तीचे पाणी शेताबाहेर काढणे.
◼️ पिकांची फेरपालट करणे.
◼️ क्षार सहनशील पिके घेणे. उदाहरणार्थ ज्वारी, गहू, कापूस, ऊस, कांदा इ.
- सुनील यादव
कृषी अधिकारी
जिल्हा मृद सर्वेक्षण व चाचणी कार्यालय, सातारा
अधिक वाचा: महसूल विभागाचे नवे आदेश, आता सात दिवसांत मिळणार शेतरस्ता; जाणून घ्या सविस्तर
