सोलापूर : येथील श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती, सोलापूरच्याबाजारात लाल कांद्याला कमाल २ हजार ३७५ तर सर्वसाधारण १ हजार प्रति क्विंटलचा भाव मिळाला.
कर्नाटकातून दरम्यान, येणारा पांढरा कांदा शुक्रवारी बाजारात कमी दिसला. दरम्यान, शुक्रवारी कांदा लिलावात लाल कांद्याच्या ३७ हजार २४२ पिशव्यांमधील १८ हजार ६२१ क्विंटल कांदा विक्रीस आला होता.
१८६ लाल कांद्याच्या ट्रकमधून शुक्रवारी १ कोटी ८६ लाख २१ हजारांची उलाढाल झाल्याची माहिती बाजार समितीच्या कांदा विभागाने दिली.
शुक्रवारी पांढऱ्या कांद्याचे ९ ट्रक बाजार समितीत आले होते. किमान दर २०० तर कमाल दर ३१०० एवढा मिळाला. सर्वसाधारण दर १५०० रुपये एवढा होता.
पांढऱ्या कांद्यातून १ कोटी ४३ लाख ७ हजारांची उलाढाल झाली आहे. बाजार समितीत अहिल्यानगर, पुणे, सोलापूर जिल्ह्याच्या विविध भागांतून कांदा विक्रीसाठी बाजारात आला होता.
भावात चांगली वाढ झाल्याने बाजारात कांदा विक्रीसाठी ज्यादा येत असल्याची माहिती बाजार समितीमधील कांदा विभागाने लोकमतशी बोलताना दिली.
अधिक वाचा: रब्बी हंगामातील 'या' सहा पिकांसाठी विमा अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु; जाणून घ्या सविस्तर
