जीवाचे रान करून कांदा पिकाचे विक्रमी उत्पन्न मिळवण्यासाठी धडपडलेल्या शेतकऱ्यांना कोसळलेल्या दराने निराश केले आहे. जवळपास कांदा चाळीतच सडला असल्याने उरलेला कांद्याला कोंब फुटायला सुरुवात झाली आहे. अशा परिस्थितीत कांदा उकिरड्यावर फेकण्याशिवाय पर्याय नसल्याने कांद्याला 'साश्रू नयनांनी निरोप' देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
भाववाढीची आस लागलेल्या शेतकऱ्यांचा कांदा चाळीतच सडाला आहे. त्यामुळे कांदा विकण्याशिवाय किंवा फेकण्याशिवाय दुसरा पर्याय चाळीमध्ये साठवलेला कांदा खराब झाला असून राहिलेल्या कांद्याना कॉंब फुटायला सुरुवात झाली आहे. सध्या तरी कांद्याला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडत आहे.
नाशिक जिल्ह्याच्या कसमादे परिसरातील शेतकरी दरवर्षी दर्जेदार कांदा पीक काढतात. त्यात पाण्याचे योग्य नियोजन करत उत्पन्न मिळवतात. यावर्षीही शेतकऱ्यांना मनाप्रमाणे उत्पन्न मिळाले. परंतु आता भाववाढ होत नसल्याने नुकसान सहन करावे लागत आहे.
बऱ्याचशा शेतकऱ्यांकडे रब्बी पिकांचे पेरण्या, बियाणे, खते, मशागत आदी खर्च करण्यासाठी कांदा सोडून दूसरे उत्पन्न मिळवून देणारे पीकच नव्हते परंतु कांद्याला चांगला भाव मिळेल या आशेवर अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून, गरज भागविण्याचा प्रयत्न केला पण साठवलेला अर्धा कांदा सडला उरलेल्या कांद्याला कोंब आल्याने फेकण्याशिवाय पर्यायच नाही.
शेतमाल वाहतुकीचे भाडे वाढले आहे. याबरोबरच, खतांच्या किमतीत वाढ झाली असताना, शेतीमालाचे भाव मात्र कोसळत आहेत. शेतकऱ्यांप्रती सरकारची अनास्था वेळोवेळी दिसून आली आहे. त्यामुळे आता सरकारने दिलासादायक निर्णय घ्यावा. - सुनील खैरनार, शेतकरी बटार.
कांदा निर्यातीबाबत केंद्र सरकारचे धरसोड धोरण बंद करून सरकारने नाफेडमार्फत ३००० रुपये दराने कांदा करावा व तो कांदा निर्यात करावा, अन्यथा त्याची वाट्टेल ती विल्हेवाट लावावी. निदान शेतकऱ्यांच्या पदरात दोन पैसे पडतील. - केशव सूर्यवंशी, तालुकाध्यक्ष शेतकरी संघटना, बागलाण जि. नाशिक.