Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > नोव्हेंबरमध्ये २०० ते ३०० रुपये किलोने विकल्या जाणाऱ्या शेवग्याच्या शेंगेला वाचा आज काय मिळतोय दर?

नोव्हेंबरमध्ये २०० ते ३०० रुपये किलोने विकल्या जाणाऱ्या शेवग्याच्या शेंगेला वाचा आज काय मिळतोय दर?

What is the price of the pods of the drumstick, which were sold for Rs 200 to Rs 300 per kg in November, today? | नोव्हेंबरमध्ये २०० ते ३०० रुपये किलोने विकल्या जाणाऱ्या शेवग्याच्या शेंगेला वाचा आज काय मिळतोय दर?

नोव्हेंबरमध्ये २०० ते ३०० रुपये किलोने विकल्या जाणाऱ्या शेवग्याच्या शेंगेला वाचा आज काय मिळतोय दर?

shevga sheng bajar bhav शेवगा शेंगा आरोग्यासाठी लाभदायक असल्यामुळे मुंबई, नवी मुंबईमध्ये वर्षभर शेंगांना मागणी असते. राज्याच्या विविध भागांतून शेवगा शेंग मुंबईमध्ये विक्रीसाठी येत असते.

shevga sheng bajar bhav शेवगा शेंगा आरोग्यासाठी लाभदायक असल्यामुळे मुंबई, नवी मुंबईमध्ये वर्षभर शेंगांना मागणी असते. राज्याच्या विविध भागांतून शेवगा शेंग मुंबईमध्ये विक्रीसाठी येत असते.

नवी मुंबईबाजार समितीमध्ये नोव्हेंबरमध्ये २०० ते ३०० रुपये किलो दराने विकल्या जाणान्या शेवगा शेंगांचे दर २० ते २६ रुपये किलो एवढे खाली आले आहेत.

मागणीपेक्षा आवक जास्त होत असल्यामुळे दर पडले असून शेतकऱ्यांचे नुकसान होऊ लागले आहे. पुढील काही दिवस भाव कमीच राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शेवगा शेंगा आरोग्यासाठी लाभदायक असल्यामुळे मुंबई, नवी मुंबईमध्ये वर्षभर शेंगांना मागणी असते. राज्याच्या विविध भागांतून शेवगा शेंग मुंबईमध्ये विक्रीसाठी येत असते.

२०२५ च्या अखेरीस शेवग्याचा तुटवडा निर्माण झाला होता. मुंबई बाजार समितीमध्ये २०० ते ३०० रुपये व किरकोळ मार्केटमध्ये ४०० ते ५०० रुपये किलो दराने शेवग्याची विक्री झाली होती.

शेवगा शेंग सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली होती; परंतु नवीन वर्षांच्या सुरुवातीपासून आवक वाढण्यास सुरुवात झाली आहे.

चार महिन्यांत बाजारभाव १५ पट घसरला एप्रिलमध्ये होलसेल मार्केटमध्ये २० ते २६ रुपये किलो एवढा दर मिळाला आहे. किरकोळ मार्केटमध्येही ५० ते ७० रुपये किलो दराने विकला जात आहे.

चार महिन्यांत बाजारभाव जवळपास १५ पट कमी झाले आहेत. मुंबईमध्ये शेवगा पाठविल्यानंतर वाहतूक खर्च, देखभाल खर्च वगळल्यास शेतकऱ्यांच्या हातामध्ये फारसे काहीही रहात नाही.

शेतकऱ्यांचे नुकसान होऊ लागले आहे. आवक वाढल्यामुळे दरामध्ये फरक पडला असून, पुढील काही दिवस अशीच स्थिती राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

एपीएमसीत प्रतिकिलो दर
◼️ नोव्हेंबर - २००-३००
◼️ डिसेंबर - १८०-२००
◼️ जानेवारी - ६०-२०
◼️ फेब्रुवारी - ६० - ८०
◼️ मार्च - ५०-५०
◼️ एप्रिल - २०-२६

कोठे होते उत्पादन?
◼️ राज्यात सोलापूर, सांगली, जालना, औरंगाबाद, नाशिक, पालघर जिल्ह्यांमध्ये शेवगा शेंगांचे उत्पादन होते.
◼️ इतरही काही ठिकाणी शेवगा उत्पादन होत असते.
◼️ राज्याच्या विविध भागांतून मुंबईमध्ये शेवगा शेंग विक्रीसाठी येत असतात.

शेवगा खाण्याचे फायदे
◼️ आरोग्यासाठी शेवगा लाभदायक आहे.
◼️ यामुळे हाडे मजबूत होतात, रोगप्रतिकार शक्ती वाढते, मधुमेह नियंत्रणात येतो.
◼️ पचनक्रिया सुधारून रक्तशुद्धी व हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढण्यासही मदत होते.

अधिक वाचा: तब्बल २० वर्षानंतर राज्य महसूल विभागाच्या रचनेत मोठे बदल; ३५ हजार ८७६ पदांना मंजुरी

Web Title: What is the price of the pods of the drumstick, which were sold for Rs 200 to Rs 300 per kg in November, today?