Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > तुर बाजार दराने ओलांडला ९ हजारांचा उंबरठा; १० हजाराचा टप्पा गाठण्याची शक्यता

तुर बाजार दराने ओलांडला ९ हजारांचा उंबरठा; १० हजाराचा टप्पा गाठण्याची शक्यता

Tur market price crosses 9 thousand mark; likely to reach 10 thousand mark | तुर बाजार दराने ओलांडला ९ हजारांचा उंबरठा; १० हजाराचा टप्पा गाठण्याची शक्यता

तुर बाजार दराने ओलांडला ९ हजारांचा उंबरठा; १० हजाराचा टप्पा गाठण्याची शक्यता

Tur Market Rate Update : खुल्या बाजारात तुरीच्या दराने मोठी उसळी घेतली असून, विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये नव्या तुरीचे दर प्रतिक्विंटल नऊ हजार रुपयांच्या पुढे गेले आहेत. त्यामुळे तूर उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Tur Market Rate Update : खुल्या बाजारात तुरीच्या दराने मोठी उसळी घेतली असून, विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये नव्या तुरीचे दर प्रतिक्विंटल नऊ हजार रुपयांच्या पुढे गेले आहेत. त्यामुळे तूर उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

खुल्या बाजारात तुरीच्या दराने मोठी उसळी घेतली असून, वाशिम जिल्ह्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये नव्या तुरीचे दर प्रतिक्विंटल नऊ हजार रुपयांच्या पुढे गेले आहेत. त्यामुळे तूर उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मानोरा कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी नव्या तुरीला कमाल ९,१५० रुपये प्रती क्विंटल असा उच्चांकी दर मिळाला.

यंदाच्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे तुरीच्या पिकाला मोठा फटका बसला असून, उत्पादनात लक्षणीय घट झाली आहे. अनेक भागांत पीक पूर्णतः हातातून गेल्याने बाजारात तुरीची आवक मर्यादित आहे. याचा थेट परिणाम दरवाढीवर होत असल्याचे चित्र सध्या बाजारात दिसून येत आहे.

इतर शेतमालाच्या तुलनेत यंदा तुरीचे उत्पादन कमी असून, त्यातच दर्जेदार मालाला वाढलेली मागणी, साठेबाजीवरील निर्बंध आणि बाजारातील वाढती गरज यामुळे आगामी काळातही तुरीचे दर स्थिर राहण्याची किंवा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांनी तूर विक्री करताना विविध बाजार समित्यांतील दरांची तुलना करूनच निर्णय घ्यावा, असे आवाहन बाजार तज्ज्ञांनी केले आहे. उत्पादनातील घट आणि मागणीतील वाढ लक्षात घेता काही महिने तुरीच्या दरातील तेजी कायम राहण्याची शक्यता असून, ही बाब शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरत आहे.

शनिवारी किंचित घसरण

जिल्ह्यातील बाजार समित्यांत शुक्रवारी तुरीच्या दराने नऊ हजारांचा टप्पा ओलांडल्याचे दिसले. मात्र, शनिवारी तुरीच्या दरात किंचित घसरण पाहायला मिळाली. तथापि, तुरीचे दर साडे आठ हजार रुपये प्रती क्विंटलच्यावरच होते. या दिवशी कारंजात नव्या तुरीला कमाल ८ हजार ७४० रुपये प्रती क्विंटलचा दर मिळाला.

शासकीय खरेदीच्या घोषणेचा आधार!

केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी महाराष्ट्रात ३.३७ लाख टन तुरीची हमीभावाने खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे. रविवार, २५ जानेवारी रोजी यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला. आगामी काही दिवसांत शासकीय खरेदी सुरू होण्याची शक्यता असून, या घोषणेमुळे खुल्या बाजारातील तुरीच्या दरांना मोठा आधार मिळणार आहे.

जुन्या तुरीतही तेजी

नव्या तुरीच्या दरात वाढ होत असतानाच बाजार समित्यांमध्ये जुन्या तुरीचे दरही तेजीत आहेत. शुक्रवारी वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत जुन्या तुरीला कमाल ८,१०० रुपये प्रती क्विंटल दर मिळाला.

बाजारात आवकही वाढली!

तुरीच्या दरात सातत्याने वाढ होत असताना बाजार समित्यांमध्ये या शेतमालाची आवकही वाढू लागली आहे. शुक्रवारी जिल्ह्यातील चार प्रमुख बाजार समित्यांमध्ये ९ हजार क्विंटलपेक्षा अधिक तुरीची आवक नोंदविण्यात आली.

तुरीला कोठे किती दर? (प्रती क्विंटल)

वाशिम - ८,६००
कारंजा - ९,०६०
मानोरा - ९,१५०
रिसोड - ९,०००

हेही वाचा : मंदीच्या लाटेत देखील 'हा' शेतकरी म्हणतोय मेथीची एक जुडी देतेय ५० रुपयांचे उत्पन्न; वाचा सविस्तर

Web Title : तुअर की कीमतें ₹9,000 के पार, ₹10,000 तक पहुंचने की संभावना

Web Summary : भारी बारिश से उत्पादन में कमी के कारण वाशिम में तुअर की कीमतें ₹9,000/क्विंटल से ऊपर पहुंच गईं। सरकारी खरीद समर्थन और बढ़ती मांग से कीमतें ऊंची रहने की संभावना है। किसानों को बेचने से पहले बाजार दरों की तुलना करने की सलाह दी गई। पुरानी तुअर की कीमतें भी बढ़ रही हैं।

Web Title : Tur Prices Surge Past ₹9,000, ₹10,000 Mark Possible

Web Summary : Tur prices surged past ₹9,000/quintal in Washim due to reduced production from heavy rains. Government procurement support and increased demand suggest prices will likely remain high. Farmers advised to compare market rates before selling. Old tur prices also rising.