Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > सोलापूर बाजार समितीत 'या' शेतकऱ्याचा बेदाणा ठरला किंग; वाचा प्रतिकिलो काय मिळाला दर?

सोलापूर बाजार समितीत 'या' शेतकऱ्याचा बेदाणा ठरला किंग; वाचा प्रतिकिलो काय मिळाला दर?

This farmer's raisins became king in the Solapur Market Committee; Read what price was obtained per kg? | सोलापूर बाजार समितीत 'या' शेतकऱ्याचा बेदाणा ठरला किंग; वाचा प्रतिकिलो काय मिळाला दर?

सोलापूर बाजार समितीत 'या' शेतकऱ्याचा बेदाणा ठरला किंग; वाचा प्रतिकिलो काय मिळाला दर?

bedana bajar bhav सोलापूर येथील श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी १६ एप्रिल २०२६ झालेल्या बेदाणा लिलावात मोठी आवक पाहायला मिळाली.

bedana bajar bhav सोलापूर येथील श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी १६ एप्रिल २०२६ झालेल्या बेदाणा लिलावात मोठी आवक पाहायला मिळाली.

सोलापूर : श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी १६ एप्रिल २०२६ झालेल्या बेदाणा लिलावात मोठी आवक पाहायला मिळाली.

या लिलावात दक्षिण सोलापूर तालुक्यातील शिरपणहळ्ळी येथील एका शेतकऱ्याच्या बेदाण्याला ३८२ रुपये प्रतिकिलो इतका विक्रमी उच्चांकी दर मिळाला आहे.

दरम्यान, सोलापूरची श्री सिद्धेश्वर बाजार समिती दक्षिण महाराष्ट्रातील बेदाणा व्यापाराचे प्रमुख केंद्र आहे, जिथे दर गुरुवारी लिलाव होतो.

गुरुवारच्या लिलावात एकूण ३,६९,७४ बॉक्सची आवक झाली होती त्यापैकी १९ हजार ५४५ बॉक्सची विक्री झाली आहे.

१७ हजार ४२९ बॉक्स अद्याप अनसोल्ड आहेत. वजनाचा विचार करता, एकूण ५५४ टन मालापैकी २९३ टन मालाचा यशस्वी व्यवहार झाला.

बाजारपेठेत बेदाण्याला किमान १३० रुपये, तर सरासरी २९० रुपये दर मिळाला. बेदाण्याला मिळणारा हा चांगला दर पाहून शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

लक्ष्मण बिराजदारांचा बेदाणा ठरला 'किंग'
◼️ दक्षिण सोलापूर तालुक्यातील शिरपणहळ्ळीचे लक्ष्मण बसलिंगप्पा बिराजदार यांच्या बेदाण्याला व्यापाऱ्यांनी मोठी पसंती दर्शवली.
◼️ बसवराज श्रीशैल अंबारे या अडत्याने हा माल विक्रीसाठी मांडला होता, तर व्यापारी राम माळी यांनी तो ३८२ रुपये दराने खरेदी केला.

बाजार समितीत सध्या नवीन बेदाण्याची आवक होत आहे. सांगली आणि विजापूरनंतर सोलापुरात चांगली आवक होते, तसेच दर वाढल्याने व्यवहारात वाढ झाली आहे. उच्च दर्जाच्या बेदाण्याला ३८२ ते ४०० रुपये प्रतिकिलोपर्यंत दर मिळतात. पुढील वर्षभर यंदा चांगला दर राहील, असा अंदाज आहे. - दिलीप माने, सभापती, बाजार समिती

अधिक वाचा: बाजारात शाळू ज्वारीपेक्षा मालदांडी ज्वारीला अधिक पसंती; वाचा प्रतिक्विंटल काय मिळतोय दर?

Web Title : सोलापुर मंडी: किसान के किशमिश का दबदबा, रिकॉर्ड कीमत पर बिकी

Web Summary : सोलापुर में, शिरपनहळ्ळी के एक किसान को मंडी नीलामी में अपनी किशमिश के लिए रिकॉर्ड ₹382/kg मिले। सोलापुर मंडी में 3,69,74 बक्सों की आवक हुई। लगभग 19,545 बक्से बेचे गए। किशमिश की औसत कीमत ₹290/kg थी, जिससे किसानों में खुशी है।

Web Title : Solapur Market: Farmer's Raisins Reign Supreme, Fetching Record Price

Web Summary : In Solapur, a farmer from Shirpanhalli received a record ₹382/kg for his raisins at the market auction. The Solapur market saw an arrival of 3,69,74 boxes. Around 19,545 boxes were sold. The average price for raisins was ₹290/kg, bringing cheer to farmers.