पुणे : युद्धामुळे आखाती देशात होणारी घटलेली आयात, आता त्यानंतर अवकाळी पावसाचा फटका कलिंगड, खरबुजाच्या विक्रीवर झाला आहे.
एकीकडे आवक चांगली होत असताना ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे घाऊक बाजारात कलिंगडाच्या भावात किलोमागे ५ रुपये, तर खरबुजाच्या भावात ७ रुपयांनी घट होती.
परिणामी, शेतकरी हवालदिल झाला आहे. उत्पादन, वाहतूक खर्च निघणेही मुश्कील झाले आहे. मात्र गेले दोन दिवसांपासून पुणे शहरात उन्हाचा तडाखा जाणवत असल्याने पुन्हा कलिंगड व खरबूजला मागणी वाढली आहे.
मार्केटयार्ड घाऊक बाजारात सध्या १५ ते २० रुपये किलोला भाव मिळत असल्याने कलिंगडच्या कवडीमोल दरामुळे शेतकरीच गार झाले आहेत.
कलिंगडला १० ते १५ रुपये किलोचा भाव◼️ बंपर उत्पादन, अवकाळी पाऊस आणि आखातातील युद्धाचा कलिंगड पिकाला चांगलाच फटका बसला आहे.◼️ काही दिवसांपूर्वी ३० ते ४० रुपये किलोने विक्री होणारे कलिंगड आता १० ते १५ रुपयांपर्यंत घसरले आहे.◼️ अनेक ठिकाणी तर विक्रीअभावी कलिंगड फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत आहे याचा फटका बसत आहे.◼️ मात्र गेले दोन दिवसांपासून पुणे शहरात कडाक्याचे ऊन असल्याने सध्या बाजारात रसाळ फळांना मागणी वाढली आहे.◼️ यामध्ये तोडणी, वाहतुकीचाही खर्च परवडेना उन्हाळ्यामुळे कलिंगड, खरबूजला मोठी मागणी होती.◼️ मात्र, मागील काही दिवसांपासून शहरात अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. पावसाने जोरदार हजेरी लावली.◼️ त्यावेळी खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरविली होती. मात्र गेले दोन दिवसांपूर्वीपासून मागणी वाढली असली तरी कवडीमोल भाव मिळत आहे.
उन्हाळ्यात कलिंगड, खरबूज विक्रीतून शेतकऱ्यांना फायदा होतो. मात्र, अवकाळी पावसामुळे भावात घसरण झाली आहे. मात्र गेले दोन दिवसांपासून कलिंगड आणि खरबुजाला मागणी वाढली आहे तरी ही मार्केटयार्ड बाजारात सध्या १५ ते २० रुपये किलोला भाव आहे. - पांडुरंग सुपेकर, व्यापारी, मार्केटयार्ड
अधिक वाचा: पुणे-बंगळुरू ग्रीनफिल्डसाठी २० हजार एकरचे भूसंपादन; महामार्गात कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश?
Web Summary : Heatwave in Pune drives watermelon demand up after unseasonal rain and export issues hurt farmers. Prices rise to ₹15-20/kg in Market Yard, offering slight relief after earlier losses due to low prices and crop spoilage.
Web Summary : पुणे में गर्मी बढ़ने से तरबूज की मांग में उछाल आया है। बेमौसम बारिश और निर्यात संबंधी समस्याओं के कारण किसानों को नुकसान हुआ था। मार्केट यार्ड में कीमतें ₹15-20/kg तक बढ़ीं, जिससे पहले हुए नुकसान से थोड़ी राहत मिली है।