चिंचेचा हंगाम सुरू झाला असून यंदा कर्नाटकमधील सुक्या मालाची आवक वाढली आहे. दमदार पावसामुळे यंदा गतवर्षापेक्षा २० टक्के जादा माल उपलब्ध होणार आहे.
महाराष्ट्रात चिंच ओलसर असल्यामुळे तो उशिरा निघणार आहे. राज्यात थंडी हटत नसल्यामुळे चिंच सध्या ओल्या स्वरूपात आहे.
बिगर फोडलेल्या चिंचेला १५ रुपयांपासून ३५ रुपयांपर्यंत किलोला भाव निघाला. गत आठवड्यात तो ४० ते ४५ रुपयांपर्यंत गेला होता.
लातूर उदगीर या पट्ट्यात गेल्या आठवड्यात झालेल्या काहीशा गारपिटीमुळे चिंचेची मागणी घटली आहे. थंडी कमी होत नसल्यामुळे चिंच ओलसर आहे.
या आठवड्यात उन्हाचा चटका बसू लागला असून चिंचेवर त्याचा परिणाम होणार आहे. पिवळसर आणि मोठी पाने असलेल्या फुटलेल्या चिंचेला १२० ते १३० अशा स्वरूपात भाव मिळत आहे.
आंध्रप्रदेश, चेन्नई, तेलंगणा, मध्यप्रदेश, राजस्थान अशा मोठमोठ्या राज्यांत चिंचेला दरवर्षाप्रमाणे याही वर्षी मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
चिंचेप्रमाणेच चिंचोक्यालादेखील ३५ ते ४० रुपये किलो असा भाव मिळत आहे. गत वर्षापेक्षा यंदा तो कमी आहे. यंदा चिंच जास्त असल्याकारणाने चिंचोक्याला भाव कमी मिळत आहे.
गत वर्षापेक्षा यंदा चिंचेला ७० टक्के फुलोरा आला होता. दमदार पावसामुळे तो तसाच टिकून राहिल्याने चिंच भरपूर प्रमाणात उपलब्ध होणार आहे.
चिंच ही उष्णकटिबंधीय प्रदेशात आढळते. भारतीय स्वयंपाकात, विशेषतः आमटी, चटणी आणि सांबारमध्ये ती मोठ्या प्रमाणावर वापरली जाते.
पचनासाठी उत्तम, अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध आणि बद्धकोष्ठतेवर गुणकारी असलेली चिंच आरोग्यासाठी फायदेशीर मानली जाते.
चिंचेचे औषधी उपयोग
◼️ चिंचेत भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी, अँटिऑक्सिडंट्स, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम असते, जे पचनक्रिया सुधारण्यास, हृदयाचे आरोग्य टिकवण्यास आणि
◼️ रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यास मदत करते. चिंचेची पौष्टिक मूल्ये आणि आरोग्यासाठी मोठे फायदे आहेत.
◼️ चिंचेमध्ये कॅलरीज कमी असतात आणि फायबर जास्त असते. हे शरीरातील जळजळ कमी करण्यास आणि सांधेदुखीमध्ये मदत करते.
◼️ चिंच रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करू शकते आणि खराब कोलेस्ट्रॉल कमी करते.
◼️ पोटदुखी, बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी चिंचेचा उपयोग आहे.
अधिक वाचा: उजनी धरणात आजमितीला किती पाणीसाठा? यंदा उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवणार का?
