Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > आरोग्यासाठीही लाभदायक आंबट-गोड चवीची करवंदे बाजारात दाखल; यंदा मिळतोय दुप्पट दर

आरोग्यासाठीही लाभदायक आंबट-गोड चवीची करवंदे बाजारात दाखल; यंदा मिळतोय दुप्पट दर

Sweet and sour yams with health benefits have been launched in the market; this year, the price is doubled | आरोग्यासाठीही लाभदायक आंबट-गोड चवीची करवंदे बाजारात दाखल; यंदा मिळतोय दुप्पट दर

आरोग्यासाठीही लाभदायक आंबट-गोड चवीची करवंदे बाजारात दाखल; यंदा मिळतोय दुप्पट दर

उन्हाळ्याची चाहूल लागताच रानमेव्याची ओढ पुन्हा एकदा वाढली असून, डोंगरदऱ्यांतील आंबट-गोड चवीची 'काळी मैना' अर्थात करवंदे अखेर आळेफाटा बाजारात दाखल झाली आहेत.

उन्हाळ्याची चाहूल लागताच रानमेव्याची ओढ पुन्हा एकदा वाढली असून, डोंगरदऱ्यांतील आंबट-गोड चवीची 'काळी मैना' अर्थात करवंदे अखेर आळेफाटा बाजारात दाखल झाली आहेत.

वडगाव आनंद : उन्हाळ्याची चाहूल लागताच रानमेव्याची ओढ पुन्हा एकदा वाढली असून, डोंगरदऱ्यांतील आंबट-गोड चवीची 'काळी मैना' अर्थात करवंदे अखेर आळेफाटा बाजारात दाखल झाली आहेत.

मात्र यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादन घटल्याने या रानमेव्याला महागाईची झळ बसली आहे. माळशेज घाट परिसरात यंदा पावसाचे प्रमाण अनिश्चित राहिल्याने करवंदांचे उत्पादन घटले आहे.

परिणामी बाजारातील आवक कमी झाली असून, दर दुप्पट झाले आहेत. गेल्या वर्षी १० रुपयांना मिळणारा वाटा यंदा २० रुपयांवर पोहोचला आहे. तरीही आळेफाटा बाजारात ग्राहकांची गर्दी ओसंडून वाहताना दिसत आहे.

करवंदे गोळा करणे ही अत्यंत कष्टाची प्रक्रिया आहे. एक पाटी करवंदे जमा करण्यासाठी विक्रेत्यांना १५ ते २० झाडांवर फिरावे लागते.

डोंगरदऱ्यांत, काट्याकुट्यांतून वाट काढत तासंतास मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे वाढलेले दर हे केवळ बाजारभाव नसून श्रमांची किंमत असल्याचे विक्रेते सांगतात.

ग्राहकांसाठी मात्र करवंदे हे केवळ फळ नसून आठवणींचा ठेवा आहे. बालपणी डोंगरात भटकताना तोडून खाल्लेली आंबट-गोड-तुरट चव आजही जिभेवर रेंगाळत असल्याने, वाढीव दराची पर्वा न करता नागरिक हा रानमेवा खरेदी करत आहेत.

श्रमांची किंमत मोठी
◼️ एक पाटी करवंदे गोळा करण्यासाठी भर उन्हात ४ ते ५ तास रानोमाळ भटकावे लागते.
◼️ काट्याकुट्यांतून फळे तोडताना हातपाय जखमी होतात.
◼️ तेव्हाच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो, असे मोरोशी येथील विक्रेते रघुनाथ खाकर यांनी सांगितले.

आरोग्यासाठीही लाभदायक
◼️ करवंदे आरोग्यासाठीही अत्यंत उपयुक्त असल्याचे वैद्यकीय अधिकारी शिवाजी फड यांनी सांगितले.
◼️ यामध्ये क जीवनसत्त्व मुबलक प्रमाणात असते, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवते.
◼️ उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी तसेच पचन सुधारण्यासाठी करवंदे फायदेशीर ठरतात, असे त्यांनी नमूद केले.

आळेफाटा परिसरात आकर्षणाचा केंद्रबिंदू
◼️ निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदाचा हंगाम महागला असला तरी 'काळ्या मैने'ची क्रेझ कमी झालेली नाही.
◼️ उलट, चवीसोबत आठवणींचा संगम घडवणारा हा रानमेवा आळेफाटा परिसरात आजही आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.

अधिक वाचा: बदललेल्या शक्तीपीठ महामार्गामुळे 'या' ३४ गावांतील जमिनीच्या किमतीत दुपटीने वाढ; एकरी काय दर?

Web Title: Sweet and sour yams with health benefits have been launched in the market; this year, the price is doubled