सोलापूर : येथील श्री सिध्देश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी ३३८ ट्रक कांद्याची आवक झाली. किमान १००, कमाल ३३०० तर सर्वसाधारण दर १२५० एवढा मिळाला.
६७ हजार ६३२ पिशव्या, ३३ हजार ८१६ क्विंटल कांद्यातून ४ कोटी २२ लाख ७० हजाराची उलाढाल सोमवारी झाल्याचे बाजार समिती प्रशासनाने सांगितले.
मागील काही दिवसांपासून कांद्याची आवक वाढत असून दरातही मोठी वाढ होत आहे. कर्नाटक, मराठवाडा, पुणे जिल्ह्यातून कांदा विक्रीसाठी सोलापुरात येत आहे.
अधिक वाचा: घरबसल्या मिळवा आता दोन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज; केंद्र सरकारने सुरु केले 'हे' नवे पोर्टल
