पिंपरी : मोशी येथील श्री नागेश्वर महाराज उपबाजारात रविवारी (दि. २४) फळभाज्यांची ५ हजार २०५ क्विंटल, पालेभाज्यांची ६२ हजार १०० गड्या आणि फळांची ४९१ क्विंटल आवक नोंदवली गेली.
करटूले ही तशी रानभाजी आहे पण त्याची मागणी पाहता सोलापूर जिल्ह्यात अनेक शेतकरी करटूले या भाजीच्या लागवडीतून चांगले पैसे मिळवतात. काही शेतकरी सेंद्रिय पद्धतीने करटूलेची लागवड करून अधिक उत्पन्न मिळवतात.
पिंपरी मंडईत सोलापूरवरून करटूले दाखल झाले असून, त्याचा दर २७० ते ३०० रुपये आहे. बंगळुरूवरून आलेले सुरण ८० रुपये किलो दराने विकले जात आहे.
पनवेलवरून आवक झालेल्या पडवळ या फळभाजीला ७० ते ८० रुपये प्रतिकिलो भाव आहे. टोमॅटोची आवक वाढूनही दर स्थिर आहेत.
असा आहे बाजारभाव (प्रतिकिलो)
कांदा : २० ते २५
बटाटा : २५ ते ३०
लसूण : १०० ते १२०
आले : ७० ते ८०
भेंडी : ५० ते ६०
गवार : ८० ते ९०
टोमॅट: ५०
मटा: २० ते १००
घेवडा : ८०
दोडका : ५० ते ६०
मिरची : ६० ते ७०
दुधी भोपळ: ४०
भुईमुग शेंग : ६० ते ८०
काकडी : ३०
कारली : ४०
डांगर : ३० ते ४०
गाजर : ५०
फ्लॉवर : ३० ते ४०
कोबी: २५ ते ३०
वांगी : ४० ते ५०,
ढोबळी: ५०
बीट: ४०,
पावटा : ६०,
वालः ६०
शेवगा : ८०,
चवळी : ५० ते ६०
घोसाळी : ५० ते ६०
कढीपत्ता : १००
लिंबू : ५० ते ६०
मका कणीस : ४०
रताळे : ८०
करटूले : २७० ते ३००
सुरण (बंगलोर) : ८०
पडवळ (पनवेल) : ७० ते ८०
अधिक वाचा: राज्यात 'या' ठिकाणी हरतालिका ते ऋषीपंचमी या चार दिवसांत पाऊस सक्रिय होणार