नासीर कबीर
करमाळा : बाजार समितीमध्ये कांद्याला ठोक भाव किलोला फक्त ५० पैसे इतका मिळाल्याने शेतकरी अक्षरशः रडकुंडीला आला आहे.
करमाळा तालुक्यातील पांगरे येथील शेतकरी अंकुश अण्णा गुंजाळ यांनी ७३ गोणी कांदा विकल्यानंतर सर्व खर्च वजा जाता त्यांच्या हातात केवळ ४०० रुपये राहिले आहेत.
बळीराजाच्या नशिबी आलेली दैना पुन्हा एकदा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाहायला मिळाली.
शेतकरी रडकुंडीला
◼️ गुंजाळ यांनी २१ एप्रिल रोजी सोलापूरच्या शरीफ ट्रेडर्स या आडत दुकानावर ७३ पिशव्या कांदा विक्रीसाठी आणला होता.
◼️ मात्र, बाजारपेठेत कांद्याची आवक वाढल्याने व मागणी घटल्याने त्यांच्या कांद्याला प्रति किलो केवळ ५० पैसे इतकाच भाव मिळाला.
◼️ मिळालेल्या पट्टीनुसार, कांद्याच्या विक्रीतून मिळालेली एकूण रक्कम व त्यावर झालेला खर्च यांचा ताळमेळ बसवणे कठीण झाले आहे.
◼️ ७३ पिशव्या कांदा विकल्यानंतर गुंजाळ यांना एकूण ५,०६८ रुपये मिळाले होते.
◼️ गाडी भाडे, हमाली, तोलाई, इतर आडत खर्च वजा जाता, प्रत्यक्षात शेतकऱ्याला केवळ ४०० रुपयेच हाती पडले.
अधिक वाचा: भाडेपट्ट्याने शेतजमीन करणाऱ्या शेतकऱ्यांना आता पीककर्ज व विमा मिळणार; वाचा 'हे' नवीन परिपत्रक
