Join us

Onion Price : भारतीय बाजारपेठेमध्ये कांद्याच्या किमती कशा ठरवल्या जातात वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 10:53 IST

गत वर्षात कांद्याच्या किंमतीत झालेली मोठी वाढ शेतकऱ्यांना पुढील वर्षात उच्च किमतीच्या लोभापोटी अधिक कांदा पिकविण्यास आकर्षित करते.

आर्थिक सिद्धांतामध्ये, मागणी व पुरवठा सिद्धांत हा अर्थव्यवस्थेवर नियंत्रण ठेवणारा मूलभूत तत्त्व मानला जातो. या सिद्धांताचे परिस्थितीनुसार वर्णन केले जाते जसे१) पुरवठा वाढला की किंमत कमी होते किंवा याउलट२) मागणी वाढली की किंमत वाढते किंवा या उलट होते.

मुळात हे तत्व मागणी आणि पुरवठा आधारावर वस्तूंची किंमत ठरवते. जेव्हा मागणी आणि पुरवठा संतुलित असतो, तेव्हा अर्थव्यवस्थेत किंमत आणि प्रमाण यांच्यात समतोल असल्याचे दिसते. भारतीयबाजारपेठेमध्ये कांद्याच्या किमती मागणी आणि पुरवठा या सिद्धांतावरच ठरत असतात.

भारतातील कांद्याच्या किमतीतील चढ-उताराचे प्रकार- भारतीय बाजारात कांद्याच्या किंमतीतील चढ-उताराचे दोन प्रकार आढळतात. पहिले म्हणजे वर्षभरात वेगवेगळ्या हंगामात होत आसलेला किमतीमधील चढ-उतार (Intra-Year Price Fluctuation) आणि दुसरे म्हणजे विभिन्न वर्षात किंमतीतील चढ-उतार (Inter-Year Price Fluctuation). वर्षभरात वेगवेगळ्या हंगामात होत आसलेला किमतीमधील चढ-उतारः याला किंमतीतील हंगामी चढ-उतार असेही म्हणतात.- कांदा हे प्रामुख्याने रब्बी पीक आहे आणि त्याची जास्त प्रमाणात एप्रिल-मे दरम्यान बाजारात आवक होते, परंतु मागणी वर्षभर समप्रमाणात असते. वरती चर्चा केल्याप्रमाणे, कांद्याची वर्षभर स्थिर मागणी आणि हंगामी अस्थिर उत्पादन यामुळे कांद्याचे दर वर्षभर स्थिर राहत नाहीत.

आंतर-वर्षाच्या किमतींमधील चढ-उतार- भारतात आंतर-वर्षाच्या किंमतीतील चढ-उतार ही कांदा पिकामध्ये सामान्य वस्तु स्थिति आहे. भूतकाळातील कांद्याच्या किंमतीतील अस्थिरतामुळे वर्तमानमध्ये आंतर-वर्षाच्या किंमतीमध्ये चढ-उतार होत असतो.- गत वर्षात कांद्याच्या किंमतीत झालेली मोठी वाढ शेतकऱ्यांना पुढील वर्षात उच्च किमतीच्या लोभापोटी अधिक कांदा पिकविण्यास आकर्षित करते. अशा परिस्थितीत शेतकरी पुढील वर्षामध्ये जास्त किमती वाढतील या आशेने जास्तीत जास्त कांद्याची लागवड करतात.परिणामी पुढील वर्षात कांद्याची अधिक लागवड झाल्याने खूप मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. जास्त उत्पादन झाल्याने मार्केटमध्ये कांद्याची आवक जास्त होते व कांद्याच्या किमती मोठ्या प्रमाणात ढासळून जातात. परिणामी पुढील वर्षात शेतकरी कांद्याची कमी लागवड करतात.अशा पद्धतीने वर्षानुवर्षे कांद्याच्या किंमतीतील अस्थिरतेचे दुष्ट चक्र सुरू असते. याव्यतिरिक्त, आंतर-वर्षाच्या किंमतीतील चढ-उतार मान्सूनची अनियमितता व इत्तर अजैविक घटकांमुळे पण होत आसते.

टॅग्स :कांदाबाजारमार्केट यार्डशेतकरीलागवड, मशागतपेरणीरब्बीमहाराष्ट्रभारत