सोलापूर : येथील श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शुक्रवारी अवघे १२७ ट्रक कांद्याची आवक झाली आहे.
मागील काही दिवसांतील गाड्यांची संख्या पाहता शुक्रवारी आलेल्या गाड्या सर्वात कमी प्रमाणात दिसून येत आहेत.
शुक्रवारी किमान १००, कमाल १२००, तर सर्वसाधारण दर ६०० रुपये मिळाला. अवकाळी पावसाचा फटका आता कांदाबाजारात येत असलेल्या मालावरून दिसून येत आहे.
दरम्यान, २५ हजार ४८४ पिशव्या १२ हजार ७४२ क्विंटल कांद्यातून ७ कोटी ६४ लाख ५ हजार २०० रुपयांची उलाढाल झाली आहे. गुरुवारी २२६ कांदा गाड्यांची आवक झाली होती.
कमाल दर १३०० रुपये मिळाला होता. सध्या सोलापूर शहरासोबतच ग्रामीण भागात अवकाळी पाऊस पडत आहे. या पावसामुळे कांद्याबरोबरच इतर शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
त्यामुळे बाजारात विक्रीसाठी येणारा कांदा मंदावला आहे. आवक मंदावली असली तरी भाव स्थिरच दिसून येत आहे.
अधिक वाचा: साडेचार फूट सरी ठेवून ८६०३२ उसाची लागवड; उत्पादनात एकरी १६० टनाची मजल मारणार
