सोलापूरच्या श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी ३३७ ट्रक कांद्याची आवक झाली. तसेच मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत २३ हजार ५०० पिशवी कांद्याची आवक झाली.
सोलापूरमध्ये किती आवक आणि कसा राहिला दर?
◼️ उन्हाळी कांद्याची आवक वाढल्याने बाजार आवारात मोठी लगबग दिसून आली.
◼️ बाजार समितीमध्ये एकूण ६७,४७० पिशव्यांची आवक झाली.
◼️ क्विंटलमध्ये हे प्रमाण ३३,७३५ क्विंटल इतके नोंदवण्यात आले.
◼️ ही आवक बाजार समितीमध्ये एकूण ३३७ ट्रकमधून झाली आहे.
कांद्याचे दर पुढीलप्रमाणे
◼️ आजच्या लिलावामध्ये कांद्याला कमाल १५०० रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला.
◼️ बहुतांश मालाचा व्यवहार हा ६५० रुपये या सर्वसाधारण दराने झाला.
◼️ दर्जेदार मालाला १५०० रुपयांपर्यंत भाव मिळाला.
◼️ आजच्या संपूर्ण व्यवहाराची एकूण किंमत २ कोटी १९ लाख रुपये इतकी राहिली.
मंचरमध्ये किती आवक आणि कसा राहिला दर?
◼️ मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी दहा किलो कांदा १४० रुपये या भावाने विकला गेला आहे.
◼️ मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला मंगळवारी १० किलोला १४० रुपये असा बाजारभाव मिळाला.
◼️ २३ हजार ५०० पिशवी कांद्याची आवक झाली आणि चांगल्या प्रतीचा कांदा दहा किलोला १४० रुपये या भावाने विकला गेला आहे.
कांद्याचे प्रति १० किलोचे दर पुढीलप्रमाणे
◼️ सुपर लॉट १ नंबर गोळा कांदा - रुपये १३० ते १४० रुपये.
◼️ सुपर कांदे १ नंबर रुपये - ११० ते १२० रुपये.
◼️ सुपर मीडियम २ नंबर कांद्यास - ९० ते १२० रुपये.
◼️ गोल्टी कांद्याला - ४० ते ८० रुपये.
◼️ बदला कांद्याला - १०० ते ४० रुपये.
सरासरी भाव कमी असल्याने अल्पभूधारक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. वाढत्या उष्णतेमुळे कांद्याची साठवणूक करणे कठीण होत असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात माल बाजारात आणत आहेत.
अधिक वाचा: शक्तिपीठ महामार्गाचा सुधारित आराखडा आला; राज्यातील 'या' १०८ गावांचा नव्याने समावेश
