Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > आंब्याची आवक सुरु; रत्नागिरी हापूसला उच्चांकी भाव, प्रति डझन कसा मिळाला दर?

आंब्याची आवक सुरु; रत्नागिरी हापूसला उच्चांकी भाव, प्रति डझन कसा मिळाला दर?

Mango arrivals begin; Ratnagiri Hapus gets highest price, how did the price per dozen get? | आंब्याची आवक सुरु; रत्नागिरी हापूसला उच्चांकी भाव, प्रति डझन कसा मिळाला दर?

आंब्याची आवक सुरु; रत्नागिरी हापूसला उच्चांकी भाव, प्रति डझन कसा मिळाला दर?

ratnagiri hapus market गेल्या काही दिवसांपासून कोकणातील हापूसची बाजारात तुरळक प्रमाणात आवक होत आहे. सोमवारी बाजारात दाखल झालेल्या एका डझनाला तब्बल उच्चांकी भाव मिळाला आहे.

ratnagiri hapus market गेल्या काही दिवसांपासून कोकणातील हापूसची बाजारात तुरळक प्रमाणात आवक होत आहे. सोमवारी बाजारात दाखल झालेल्या एका डझनाला तब्बल उच्चांकी भाव मिळाला आहे.

पुणे : गेल्या काही दिवसांपासून कोकणातील हापूसची बाजारात तुरळक प्रमाणात आवक होत आहे. सोमवारी बाजारात दाखल झालेल्या एका डझनाला तब्बल सहा हजार रूपये भाव मिळाला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे भागातील रीळ या गावातून प्रयोगशील आंबा बागायतदार मकरंद काणे यांच्या बागेतून तीन डझन हापूसची आवक झाली.

ही आवक फळबाजारातील गणेश फ्रूटस् एजन्सी या गाळ्यावर झाली. प्रति डझन सहा हजार रुपये असा उच्चांकी भाव मिळाला.

कोथरूड भागातील व्यापारी फशी बागवान यांनी या आंब्याच्या पेटीची खरेदी केली, अशी माहिती व्यापारी अरविंद मोरे यांनी दिली.

यावेळी फळ विभाग प्रमुख बाळासाहेब कोंडे, अडते असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष युवराज काची, आडते असोसिएशनचे संचालक गणेश यादव, राजू भोले, हरी ओम सेंटरचे संचालक मोहरे, राजू पतंगे उपस्थित होते.

पंधरा दिवसांत तुरळक आवक सुरू असून हापूससाठी सद्य स्थितीत चांगले हवामान आहे. त्यामुळे झाडांवर मोहोर आणि फळधारणाही चांगली आहे. येत्या पंधरा दिवसांत बाजारात तुरळक आवक सुरू होईल. प्रारंभी आवक कमीच असेल, त्यामुळे दर अधिक असतील. मात्र असेच हवामान पोषक राहिल्यास यंदा हापूसचा हंगाम चांगला राहील. दरही आवाक्यात असतील. - अरविंद मोरे, व्यापारी, मार्केटयार्ड

अधिक वाचा: आंबा पिकातील फळगळीची समस्या रोखण्यासाठी अत्यंत महत्वाचा सल्ला; करा 'ह्या' फवारण्या?

Web Title : आम का आगमन शुरू: रत्नागिरी हापुस की रिकॉर्ड कीमत।

Web Summary : पुणे में रत्नागिरी हापुस आम की आवक शुरू, ₹6,000 प्रति दर्जन का रिकॉर्ड मूल्य मिला। सीमित आपूर्ति और अनुकूल मौसम से अच्छे सीजन की उम्मीद है, लेकिन शुरुआती कीमतें अधिक होंगी। व्यापारी अरविंद मोरे को उम्मीद है कि मौसम ठीक रहने पर कीमतें स्थिर हो जाएंगी।

Web Title : Mango Arrival Begins: Ratnagiri Hapus Reaches Record Price.

Web Summary : Ratnagiri Hapus mangoes arrive in Pune, fetching a record price of ₹6,000 per dozen. Limited supply and favorable weather promise a good season, but initial prices will be high. Trader Arvind More anticipates prices will stabilize if the weather holds.