Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > मका हमीभाव केंद्र बंद; शेतकऱ्यांकडे १५ हजार क्विंटल माल पडून, खरेदी कोटा कधी वाढणार?

मका हमीभाव केंद्र बंद; शेतकऱ्यांकडे १५ हजार क्विंटल माल पडून, खरेदी कोटा कधी वाढणार?

Maize Guaranteed Price Center closed; Farmers left with 15 thousand quintals of goods, when will the purchase quota increase? | मका हमीभाव केंद्र बंद; शेतकऱ्यांकडे १५ हजार क्विंटल माल पडून, खरेदी कोटा कधी वाढणार?

मका हमीभाव केंद्र बंद; शेतकऱ्यांकडे १५ हजार क्विंटल माल पडून, खरेदी कोटा कधी वाढणार?

maka kahredi कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात असलेल्या गोडावूनमध्ये या मका खरेदी केंद्राची सुरुवात १३ जानेवारी २०२६ रोजी वरिष्ठांच्या परवानगीने करण्यात आली होती.

maka kahredi कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात असलेल्या गोडावूनमध्ये या मका खरेदी केंद्राची सुरुवात १३ जानेवारी २०२६ रोजी वरिष्ठांच्या परवानगीने करण्यात आली होती.

कुर्डूवाडी : जिल्हा मार्केटिंग कार्यालय सोलापूर व कुर्डूवाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संयुक्त विद्यमाने माढा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी मका शेतमाल खरेदी केंद्राची निर्मिती करण्यात आली होती.

त्यामध्ये तालुक्यातील ४८६ शेतकऱ्यांनी नोंदणीदेखील केल्या आहेत. त्यातील पहिल्या टप्प्यात ४१ तर दुसऱ्या टप्प्यात ४० अशा एकूण ८१ शेतकऱ्यांची २ हजार क्विंटल मका २४ फेब्रुवारीपर्यंत खरेदी केल्यानंतर संबंधित मका खरेदी केंद्र दुसऱ्यांदा बंद करण्यात आले आहे.

त्यामुळे उर्वरित नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची मका जागेवरच पडून असल्याने त्यांचे हाल होऊ लागले आहेत. कुर्डूवाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात असलेल्या गोडावूनमध्ये या मका खरेदी केंद्राची सुरुवात १३ जानेवारी २०२६ रोजी वरिष्ठांच्या परवानगीने करण्यात आली होती.

मात्र, पहिल्यांदा अवघ्या दहा दिवसांतच एकूण ४१ शेतकऱ्यांची सुमारे १ हजार क्विंटल मका खरेदी केल्यानंतर हे केंद्र बंद करण्यात आले, कारण १ हजार क्विंटल मका खरेदी करण्यापर्यतच परवानगी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून संबंधित केंद्राला मिळाली होती.

त्यानंतर पुन्हा वरिष्ठांकडून १ हजार क्विंटल मका खरेदी करण्यासाठी परवानगी देण्यात आली. त्यानंतर येथील केंद्र सुरू करण्यात आले व त्यातील एक हजार क्विंटल मका खरेदी केल्यानंतर पुन्हा बंद करण्यात आले.

त्यामुळे आजपर्यंत येथील केंद्रात ८१ शेतकऱ्यांची सुमारे २ हजार क्विंटल मका खरेदी करण्यात आली आहे. शासनाच्या परिपत्रकानुसार मक्याला २ ४०० हजार रुपये प्रतिक्विंटल हमीभाव मिळत असल्याने याकडे जास्त शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती.

याबाबत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीकडून वारंवार तोंडी मागणी करून देखील वरिष्ठांकडून केंद्र पुन्हा सुरू करण्यास अद्यापपर्यंत तरी परवानगी मिळाली नसल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीकडून सांगण्यात आले.

१५ हजार क्विंटल माल पडून
सुमारे १५ हजार क्विंटल मका नोंदणी केलेल्या शेतकऱ्याकडे अद्यापपर्यंत पडून आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून मका खरेदी केंद्र पुन्हा तातडीने सुरू करण्यात यावे, अशा आशयाचे निवेदन कृषी उत्पन्न बाजार समिती व उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीत मका खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते. आतापर्यंत दोन टप्प्यात वरिष्ठांकडून एकूण २ हजार क्विंटल मका खरेदी करण्यास परवानगी दिली होती. त्यामुळे कोटा पूर्ण झाल्यानंतर केंद्र सध्या बंद करण्यात आले आहे. याबाबत आम्ही वरिष्ठांकडे कोटा वाढवून मिळावा, अशी मागणी केली आहे. पुन्हा परवानगी मिळाल्यानंतर आपल्या येथील केंद्र तातडीने सुरू करण्यात येईल. - अजिनाथ बोंगाळे, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, कुर्डूवाडी

अधिक वाचा: राज्यातील 'हा' साखर कारखाना अंतिम ऊस दरात १०० रुपये वाढवून देणार; टनाला किती रुपये मिळणार?

Web Title : मक्का खरीद केंद्र बंद: किसानों को खरीद कोटा बढ़ने का इंतजार।

Web Summary : कुर्डुवाड़ी में 81 किसानों से 2000 क्विंटल मक्का खरीदने के बाद खरीद केंद्र बंद हो गया। 15,000 क्विंटल मक्का किसानों के पास बचा है। बाजार समिति ने खरीद फिर से शुरू करने के लिए कोटा बढ़ाने का अनुरोध किया है, जिससे किसान परेशान हैं।

Web Title : Corn Procurement Center Closure: Farmers Await Increased Purchase Quota.

Web Summary : Kurduwadi's corn procurement center closed after buying 2000 quintals from 81 farmers. 15,000 quintals remain with farmers. The market committee has requested an increased quota to restart purchases, leaving farmers in distress.