Kanda Bajarbhav : आज रविवार दिनांक ११ जानेवारी रोजी काही निवडक बाजार समितीमध्ये कांद्याची २० हजार आवक झाली. यामध्ये सर्वाधिक पुणे बाजारात चिंचवड कांद्याची १६ हजार क्विंटल आवक झाली. आज कांद्याला कमीत कमी ५०० रुपयांपासून ते १५०० रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला.
यामध्ये पुणे खडकी बाजारात लोकल कांद्याला कमीत कमी ७०० रुपये तर सरासरी ९०० रुपये, पुणे पिंपरी बाजारात कमीत कमी १००० रुपये तर सरासरी १३०० रुपये, पुणे मोशी बाजारात कमीत कमी ५०० रुपये त्या सरासरी ९५० रुपये तर मंगळवेढा बाजारात कमीत कमी १०० रुपये तर सरासरी ११०० रुपये दर मिळाला.
तसेच जुन्नर आळेफाटा बाजारात चिंचवड कांद्याला कमीत कमी १ हजार रुपये तर सरासरी १५०० रुपये, सातारा बाजारात कमीत कमी १ हजार रुपये तर सरासरी १५०० रुपये तर छत्रपती संभाजीनगर बाजारात कमीत कमी ४५० रुपये तर सरासरी ९७५ रुपये असा सरासरी दर मिळाला.
