Lokmat Agro >बाजारहाट > फुलशेतीला पाणीटंचाई आणि उन्हाची झळ; फुलांचा बाजारभाव वधारला

फुलशेतीला पाणीटंचाई आणि उन्हाची झळ; फुलांचा बाजारभाव वधारला

lack of water and heat wave in floriculture; The market price of flowers increased | फुलशेतीला पाणीटंचाई आणि उन्हाची झळ; फुलांचा बाजारभाव वधारला

फुलशेतीला पाणीटंचाई आणि उन्हाची झळ; फुलांचा बाजारभाव वधारला

पाण्याच्या समस्येचा फटका फूल उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे, परिणामी उत्पादन कमी होऊन बाजारातील फुलांची आवक घटली आहे. त्यामुळे फुले महागली असून ऐन लग्नसराईत मोगरा ९०० रुपये किलोंवर पोहोचला आहे.

पाण्याच्या समस्येचा फटका फूल उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे, परिणामी उत्पादन कमी होऊन बाजारातील फुलांची आवक घटली आहे. त्यामुळे फुले महागली असून ऐन लग्नसराईत मोगरा ९०० रुपये किलोंवर पोहोचला आहे.

शेअर :

Join us
Join usNext

पाण्याच्या समस्येचा फटका फूल उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे, परिणामी उत्पादन कमी होऊन बाजारातील फुलांची आवक घटली आहे. त्यामुळे फुले महागली असून ऐन लग्नसराईत मोगरा ९०० रुपये किलोंवर पोहोचला आहे.

लग्न समारंभात मोगऱ्याच्या फुलांना अधिक मागणी असते. शहरात फुलांचे लहान-मोठे अनेक व्यावसायिक आहेत. लग्नसराईमध्ये गजऱ्यांना मागणी वाढते, परंतु मोगऱ्याची आवक अत्यंत कमी आहे. नववधूचे हार, गजरे यामध्ये मोगऱ्याचा वापर होतो. कमी पाऊस आणि कडक उन्हामुळे यंदा मोगरा 'रुसला' आहे.

मोगरा सध्या ९०० रुपये किलो आहे. यापूर्वी मोगरा ४०० रुपये किलोने विकला जात होता. मागील वर्षी हेच दर निम्मे होते. शहरात पुणे, नगर परिसरातून लिली, गुलाब, जरबेरा, झेंडू, गलांडा अशा फुलांची आवक होत आहे.

स्थानिक परिसरातील काही शेतकरी झेंडू, गलांडा, मोगरा आदी फुलांचे उत्पादन घेतात, परंतु यंदा कमी पावसामुळे अन् कडक उन्हामुळे फुलांचेही उत्पादन घटले.

दर वाढल्यामुळे अनेक सत्कार, समारंभ तसेच लग्नात कृत्रिम फुले वापरून सजावट करण्यात येत आहे. तसेच शेवंती, निशिगंध अशा फुलांनी मागणी वाढली असून यापूर्वी ९० रुपयांवर असलेली शेवंती ३०० रुपये प्रतिकिलोवर पोहोचली आहे.

निशिगंधाची चलती, शेवंती ३०० रुपये किलो
सध्या राजा झेंडू व निशिगंधची चलती आहे. गलांडा तीन रुपयांना, तर लोकल गुलाब पाच रुपये पेंढी, हार व सजावटीची फुले अत्यल्प आल्याने त्याजागी झेंडू व निशिगंध वापरण्यात येत आहे. निशिगंधाला प्रति किलो १५० रुपये मोसमात मोजावे लागत आहेत. शेवंती फुले साडेतीनशे रुपये किलो. यापूर्वी नव्वद रुपये किलो होते.

फुलांचे दर (प्रतिकिलो)
मोगरा ₹ १९००
झेंडू ₹ १३०
गुलाब ₹२०० गड्डी
लिली ₹४० गड्डी

अधिक वाचा: ह्या फुलाला असतो वर्षभर बाजारभाव; कशी कराल लागवड?

Web Title: lack of water and heat wave in floriculture; The market price of flowers increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.