Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Market : राज्यातील 'हे' सुप्रसिद्ध कांदा मार्केट सलग तीन दिवस राहणार बंद

Kanda Market : राज्यातील 'हे' सुप्रसिद्ध कांदा मार्केट सलग तीन दिवस राहणार बंद

Kanda Market : This famous onion market in the state will remain closed for three consecutive days | Kanda Market : राज्यातील 'हे' सुप्रसिद्ध कांदा मार्केट सलग तीन दिवस राहणार बंद

Kanda Market : राज्यातील 'हे' सुप्रसिद्ध कांदा मार्केट सलग तीन दिवस राहणार बंद

apmc market closed सध्या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक वाढत आहे. गुरुवारी बाजार समितीमध्ये २६४ ट्रक कांद्याची आवक झाली आहे. किमान १००, कमाल १५२०, तर सर्वसाधारण ६०० रुपये असा दर मिळाला.

apmc market closed सध्या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक वाढत आहे. गुरुवारी बाजार समितीमध्ये २६४ ट्रक कांद्याची आवक झाली आहे. किमान १००, कमाल १५२०, तर सर्वसाधारण ६०० रुपये असा दर मिळाला.

सोलापूर : रमजान ईदनिमित्त शुक्रवार, २० मार्च व शनिवार २१ मार्च २०२६ रोजी सोलापुरातील श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती (मार्केड यार्ड) हे बंद राहणार आहे, असे बाजार समिती प्रशासनाने सांगितले.

याबाबत सर्व आडते, व्यापारी, माथाडी कामगार, ट्रान्सपोर्ट व शेतकऱ्यांना कळविले आहे. दरम्यान, बाजार समितीमध्ये कांदा लिलाव सुरू होण्यास उशिर होत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी 'लोकमत'शी बोलताना केली आहे.

बाजार समितीमध्ये कांदा लिलावाची वेळ १० वाजताची आहे. मात्र, गुरुवारी १०:३० वाजले तरी लिलाव सुरू झाला नव्हता. १०:४५ वाजता कांदा लिलाव सुरू झाल्याचे सांगण्यात आले.

सध्या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक वाढत आहे. गुरुवारी बाजार समितीमध्ये २६४ ट्रक कांद्याची आवक झाली आहे. किमान १००, कमाल १५२०, तर सर्वसाधारण ६०० रुपये असा दर मिळाला.

गुरुवारी ५२,८९८ पिशव्या २६,४४९ क्विंटल कांद्यातून १ कोटी ५८ लाख ६९ हजार ४०० रुपयांची उलाढाल झाली आहे. मार्च महिन्यात कांद्याची आवक कमी-जास्त होत आहे.

कांदा, द्राक्षे, गहू, ज्वारीचे नुकसान...
◼️ सध्या जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पाऊस पडत आहे.
◼️ या अवकाळी पावसाने कांदा, गहू, ज्वारी, द्राक्षे, भाजीपाल्यांचे नुकसान होत आहे
◼️ त्यामुळे बाजारात भाजीपाला, फळे, गहू, ज्वारीचे दर वाढले आहेत.
◼️ आहे ती पिके वाचविण्यासाठी शेतकरी धडपड करू लागला आहे.
◼️ आणखीन काही दिवस पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

अधिक वाचा: राज्यातील हवामानात मोठा बदल; 'या' जिल्ह्यांत पुन्हा गारपिटीसह अवकाळी पाऊस बरसणार

Web Title : रमजान के कारण सोलापुर प्याज बाजार तीन दिन बंद

Web Summary : रमजान के लिए सोलापुर का बाजार 20-21 मार्च, 2026 को बंद रहेगा। किसानों ने आपूर्ति बढ़ने के बावजूद प्याज की नीलामी में देरी की सूचना दी। हाल ही में हुई बेमौसम बारिश से फसलें क्षतिग्रस्त हो गईं, जिससे बाजार में कीमतें बढ़ गईं। बाजार में 264 ट्रकों में प्याज आने से ₹1.58 करोड़ का कारोबार हुआ।

Web Title : Solapur Onion Market Closed for Three Days Due to Ramadan

Web Summary : Solapur's market will be closed March 20-21, 2026, for Ramadan. Farmers reported delayed onion auctions despite increased supply. Recent unseasonal rains damaged crops, increasing market prices. The market saw a turnover of ₹1.58 crore with 264 trucks of onions arriving.