सोलापूर : येथील श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी झालेल्या कांदा लिलावात कांद्याला चांगला भाव मिळाला.
मागील काही दिवसांपासून कांद्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होत असला तरी सोमवारी भाव मात्र स्थिर असल्याचे दिसून आले.
दरम्यान, सोलापूर बाजार समितीमध्ये माढा, मंगळवेढा, करमाळ्यातून कांद्याची आवक होत आहे. सोमवारी १६३ गाड्यांची आवक झाली.
३२ हजार ७४६ पिशव्या, १६ हजार ३७३ क्विंटल मालातून १ कोटी ७१ लाख ९१ हजार ६५० रुपयांची उलाढाल सोमवारी झाल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाने दिली.
किमान दर १००, कमाल दर २५२५, तर सर्वसाधारण दर १०५० असा मिळाला. सोमवारी सकाळी सहा वाजता लिलाव पार पडला.
पावसाच्या शक्यतेने शेतकरी धास्तावला
जिल्ह्यात ढगाळ हवामान दिसून येत आहे. पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविल्याने कांदा उत्पादक शेतकरी चांगलाच चिंतेत दिसून येत आहे. काढणीला आलेला कांदा पावसामुळे खराब होईल या शक्यतेने शेतकरी चांगलाच धास्तावला असल्याचे चित्र दिसून येत आहे.
अधिक वाचा: कारखान्यांच्या वजनकाटा तपासणीचा विषय साखर आयुक्तांनी घेतला गांभीर्याने; काय घेणार अॅक्शन?
