मागील आठ दिवसांपासून कांद्याची आवक वाढू लागली आहे. शुक्रवारी १७३ ट्रक कांद्याची आवक झाली असून, चांगल्या प्रतीच्या कांद्याला प्रतिक्विंटल २२५० रुपये दर मिळाला.
तर सरासरी दरही ११५० रुपये आहे. मागील काही महिन्यांपासून सरासरी १००० ते १२०० रुपयांपर्यंत आहे. शुक्रवारी दोन कोटींची उलाढाल कांद्यातून झाली आहे.
सततच्या पावसामुळे श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीत पालेभाज्यांची आवक कमी झाली असून, दरात वाढ झाली आहे. मेथीला १३ रुपये, पालक १२ रुपये, शेपू, कोथिंबीरला आठ रुपयांचा दर मिळत आहे. किरकोळ बाजारातील दर यापेक्षा अधिक आहे.
सोलापूर बाजार समितीत भाजीपाला मार्केटमधील आवक कमी झाली होती. गुरुवारी पावसाने उघडीप दिल्याने काही प्रमाणात आवक वाढली आहे. पालेभाज्यांबरोबरच फळभाज्यांची आवक वाढत आहे.
अधिक वाचा: राज्यातील जमीन मोजणीची प्रकरणे आता तातडीने निकाली लागणार; आले नवीन १२०० रोव्हर